ब्राझीलने ११.६ अब्ज डॉलर इतक्या कमी खर्चात ऑलिम्पिक स्पध्रेचे आयोजन करण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करायला हवेच. उद्घाटन सोहळ्यासाठी पैशांची उधळण करण्यापेक्षा स्पर्धा ठिकाणांना आणि स्पर्धकांच्या सोयी-सुविधांवर अधिक खर्च करणे आयोजकांनी पसंत केले. २००८मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेसाठी ४९.१ अब्ज डॉलर खर्च करण्यात आला होता. त्या तुलनेत ब्राझील किती तरी पटींनी मागे असलेला आपल्याला वाटेल, परंतु तांत्रिकतेच्या बाबतीत रिओ ऑलिम्पिकने नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यावर भर दिला आहे. खेळाडूंना आपल्या कामगिरीवरच लक्ष केंद्रित करता यावे आणि परीक्षकांना अचूक निकाल देण्यात सहकार्य मिळावे, यासाठी रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत नवीन तांत्रिक ‘आविष्कार’ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ल्ल इलेक्ट्रॉनिक सेन्सर : तायक्वांदो क्रीडा प्रकारात पहिल्यांदा खेळाडूंच्या डोक्यावरील सुरक्षा कवचामध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या डोक्यावर लाथ (किक) मारल्यास त्याची नोंद थेट गुणांमध्ये होणार आहे. त्यामुळे पंचावरील दडपण कमी होणार आहे.
पुनर्आढावा प्रद्धत
ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा व्हॉलीबॉल आणि बिच व्हॉलीबॉल स्पध्रेत खेळाडूंना पुनर्आढावा पद्धतीचा (रिवू) वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे खेळाडूंनी एखाद्या निर्णयाला केलेल्या आव्हानाचे पुनप्र्रक्षेपण मैदानावरील पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.
ध्वनिविषयक प्रणाली
नेमबाजीत लेझर तंत्रज्ञानाची जागा ध्वनिविषयक प्रणालीला देण्यात आली आहे. ‘मिलिमेट्रिक सुस्पष्टता’ मोजण्यासाठी याचा वापर होणार असून खेळाडूंच्या बंदुकांवर रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग लावण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आर्थिक व्यवहारांसाठी एनएफसी सुविधा
विझा आणि ब्राझीलमधील बँकांनी आर्थिक व्यवहारासाठी नियर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) प्रणालीला सुरुवात केली. या प्रणालीमुळे खेळाडू किंवा पर्यटकांना दिलेल्या ब्रेसलेटद्वारे खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम भरणे सोपे जाणार आहे. खेळाडू, प्रमुख पाहुणे आणि पत्रकार अशा एकूण ३००० लोकांना हे ब्रेसलेट देण्यात आले आहेत.
सुरक्षारक्षक ‘फुगा’
रिओ स्पध्रेतील सुरक्षेवर करडी नजर ठेवण्यासाठी उच्च रिझोल्यूशनचे कॅमेरे असलेले चार फुगे आकाशात घिरटय़ा घालत आहेत. ब्राझीलमधील अल्टाव्हे या उत्पादकाने या तंत्रज्ञानाचा शोध लावला असून या कॅमेराचे छायाचित्र थेट सैन्याला मिळण्याची सोय करण्यात आली आहे. ऑलिम्पिकमध्ये सुरक्षततेसाठी पहिल्यांदा अशा प्रकारच्या उपकरणाचा वापर होत आहे. २०२०ची ऑलिम्पिक, २०२२च्या विश्वचषक स्पध्रेतही हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी आयोजकांनी उत्सुकता दाखवली आहे.
पाण्याखालील दर्शनी पट्टी
जलतरणपटूंना टप्पे लक्षात ठेवण्यापेक्षा स्वत:च्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी पाण्याखाली टप्पे मोजणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्याच्या तळाला हे तंत्रज्ञान बसविण्यात आले असून खेळाडूच्या कामगिरीची अचूक नोंद ते करणार आहे. ८०० व १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूला कामगिरीवर अधिक लक्ष देणे सोपे जाणार आहे. कझान येथे २०१५मध्ये पार पडलेल्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. त्यानंतर रिओ स्पध्रेपूर्वी मे महिन्यात याची चाचणी घेण्यात आली.
जीपीएस तंत्रज्ञान
नौकानयन स्पध्रेत स्पर्धकाच्या नौकेवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे आयोजकांसह प्रेक्षकांनाही स्पर्धकाच्या कामगिरीची किंवा ठिकाणाची माहिती सहजपणे मिळणार आहे.