लूटमारी, हिंसात्मक जमाव, अतिरेकी हल्ले आदी आव्हानांना तोंड देणे ही रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रमुखांची कसोटीच ठरणार आहे.
पुढील वर्षी ५ ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दहा हजारपेक्षा जास्त खेळाडू व हजारो प्रेक्षकांच्या सुरक्षा व्यवस्थेची व्यवस्था येथे करावी लागणार आहे. सुरक्षा समिती प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ८५ हजार सुरक्षा सैनिक तैनात केले जाणार आहेत. लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या वेळी ४० हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
हिंसात्मक घटनांबाबत ब्राझीलची ख्याती आहे. दरवर्षी या देशात ५२ हजार लोकांची हत्या केली जाते. दररोज सरासरी तीन ते चार लोकांची हत्या होत असते. पण असे असूनही ब्राझीलमध्ये कॉन्फडरेशन चषक व विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसह अनेक जागतिक स्तरावरील कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केले गेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचेही अधिवेशन येथे आयोजित करण्यात आले असून त्यास १९१ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Story img Loader