रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदासाठी आता भारतीय ऑलिम्पिक समितीने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला गळ घातली आहे. ऑलिम्पिक समितीने सचिनला त्यासाठी पत्र पाठविल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. आता सचिन हा प्रस्ताव स्विकारणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी ब्रँड अॅम्बेसेडरपदावर करण्यात आलेल्या अभिनेता सलमान खानच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
चरित्रपट काढून बॉलीवूडने माझ्यावर उपकार केले नाहीत; मिल्खा सिंगांचे सलीम खान यांना प्रत्युत्तर
या मुद्द्यावरून क्रीडापटुंमध्ये उभी फुट पडली होती. कुस्तीपटू योगेश्वर दत्त तसेच ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी सलमानच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तर अव्वल नेमबाजपटू अभिनव बिंद्रासह काही क्रीडापटूंनी सलमानच्या नियुक्तीचे स्वागत केले होते. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक समितीने लवकरच आणखी काही सदिच्छादूतांची नेमणूक करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
Indian Olympic Association (IOA) writes a letter to Sachin Tendulkar to be a Goodwill Ambassador for India for Rio Olympics 2016.
— ANI (@ANI_news) April 29, 2016