Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला होता, देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पंत दिल्ली येथून देहरादूनला जात असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कारला आग लागल्याने बाहेर पडण्यासाठी पंतला काच फोडावी लागली होती. पंतच्या अपघाताची माहिती मिळताच पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अगदी रोहित शर्मा, विराट कोहली, उर्वशी रौतेला या सगळ्यांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष चौकशी केली. मात्र या दरम्यान रणजी ट्रॉफीच्या सामन्यात व्यस्थ असल्याने ईशान किशनला माहीतच नव्हतं. ज्यावेळी एका चाहत्याने ईशानला ऋषभच्या अपघाताविषयी सांगितलं तेव्हा तो अक्षरशः थक्क झाला होता. यावेळी ऋषभने एका शब्दात दिलेली प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमवर उपस्थित चाहत्यांना भेटण्यासाठी आलेल्या इशानला चाहत्यांकडून ऋषभच्या अपघाताची माहिती मिळाली आणि त्याला धक्काच बसला. त्याची पहिली प्रतिक्रिया होती “क्या” (काय)! यानंतर तो काही बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हता. मग थांबून त्याने पुन्हा त्या चाहत्यांना विचारलं तू काय सांगतोय? यावर सर्व तपशील जाणून घेऊन इशानही थक्क झाला होता.

हे ही वाचा<< ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा

पंतच्या दुखापतींमुळे आता त्याला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यालाही मुकावे लागू शकते. ऋषभच्या जागी आता टीम इंडियामध्ये दुसरा कीपर उपेंद्र यादवसह इशानला मैदानात उतरु शकतो.

ऋषभ पंतचा अपघात झाला अन..

हे ही वाचा<< ऋषभ पंतला भेटायला गेले अनिल कपूर व अनुपम खेर; नेटकऱ्यांना फोटोमध्ये दिसलं भलतंच..

दरम्यान, आमदार, मंत्री, अधिकारी आणि अभिनेत्यांसह चाहत्यांच्या गर्दीमुळे त्याला विश्रांती मिळत नसल्याची तक्रार करत रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी ऋषभ पंतच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant accident ishan kishan shocked says only one word after ranji trophy match video goes viral svs