Rishabh Pant Record in IND vs AUS Perth Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील आजपासून सुरू झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी काही खास नव्हती. टीम इंडिया अवघ्या १५० धावा करून सर्वबाद झाली. भारताची टॉप ऑर्डर धावा करण्यात अयशस्वी ठरली. संघासाठी सर्वात मोठी धावसंख्या पदार्पणवीर नितीश कुमार रेड्डीनेकेली. त्याने ५३ चेंडूत ४१ धावा करत संघाचा डाव उचलून धरला. यानंतर दुसरी सर्वोच्च धावसंख्या ३१ धावांची होती, जी ऋषभ पंतने केली. या ३१ धावांमुळे पंतने आणखी एक पराक्रम केला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या एका खास यादीत ऋषभ पंत दाखल झाला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls in IND vs AUS Boxing Day Test at Melbourne match
IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Smriti Mandhana World Record Most Runs in Calendar Year in Woman Cricket INDW vs WIW
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा विश्वविक्रम, २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज
R Ashwin Top 15 Records and Milestones in International Cricket
R Ashwin: ७६५ एकूण विकेट, मालिकावीर पुरस्कार, शतकं अन् बरंच काही… अश्विनच्या कारकिर्दीतील टॉप-१५ अनोखे विक्रम
Jasprit Bumrah Breaks Kapil Dev Record and Becomes Most Wicket Taker in Australia for India IND vs AUS Gabba
IND vs AUS: जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये घडवला इतिहास, कपिल देवला मागे टाकत ठरला नंबर वन
Shoaib Akhtar Statement on Fastest Ball Record in Cricket Said ICC should then wash my legs and drink that water
VIDEO: “ICC ने माझ्या पायाचं तीर्थ प्यावं…”, शोएब अख्तरचं धक्कादायक वक्तव्य, सर्वात वेगवान चेंडूच्या रेकॉर्डबाबत बोलताना काय म्हणाला?

ऋषभ पंतची बेधडक फलंदाजी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असला तरी अंतिम फेरीत जाण्याची शक्यता नक्कीच आहे. दरम्यान, आतापर्यंत फक्त तीन भारतीय फलंदाजांना WTC म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये २ हजारपेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता ऋषभ पंतच्या नावाचाही यात समावेश झाला आहे. ऋषभ पंत रस्ते अपघातामुळे जवळपास दोन वर्षे क्रिकेटपासून दूर होता. पण आता पुनरागमन केल्यानंतर त्याने अप्रतिम कामगिरी करत हा टप्पा गाठला.

हेही वाचा – IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. ज्याने आतापर्यंत ३७ सामन्यांत २६८५ धावा केल्या आहेत. यानंतर विराट कोहली आहे, त्याने आतापर्यंत ४२ सामने खेळले असून डब्ल्यूटीसीमध्ये त्याने २४३२ धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंतने ३० सामने खेळत २०२७ धावा केल्या आहेत. २ हजार धावांचा टप्पा गाठणारे हे ३ फलंदाज आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर शुबमन गिल आहे, ज्याने २९ सामन्यांमध्ये १८०० धावा केल्या आहेत.

हेही वाचा – KL Rahul Wicket Controversy: केएल राहुल आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांनी घाईत दिला निर्णय अन् राहुलच्या विकेटमुळे सुरू झाला नवा वाद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे जो रूट. जो इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. त्याने आतापर्यंत ६१ सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत ५३२५ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या नावावर चार हजार धावाही नाहीत. मार्नस लबुशेन दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ४६ सामन्यांत ३९०४ धावा केल्या आहेत.

Story img Loader