Rishabh Pant Broke MS Dhoni Record with Fifty IND vs NZ: भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडने दिलेली ३५६ धावांच्या आघाडीसमोर भारताच्या सर्वच फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत भारताला सामन्यात कायम ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर सर्फराझ खानने आणि ऋषभ पंतने झटपट खेळी करत भारताची धावसंख्या ३४४ वर नेली. पावसाने व्यत्यय आणल्याने सामना थांबवला असून भारत फक्त १२ धावांनी मागे आहे. यादरम्यान सर्फराझ खानने आपले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. तर ऋषभ पंतने त्याला चांगली साथ देत अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकासह ऋषभ पंतने धोनीचा विक्रम मोडत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १२वे अर्धशतक झळकावले आहे. चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत तो ५३ धावांवर नाबाद परतला. यादरम्यान त्याने ५६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह एक जबरदस्त खेळी केली. सर्फराझ खानसोबत त्याने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले आहे. या दोन खेळाडूंनी आतापर्यंत ११३ धावांची भागीदारी केली आहे. त्याचवेळी, या दमदार खेळीदरम्यान ऋषभ पंतने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला एका खास यादीत मागे टाकले आहे.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

ऋषभ पंतने या डावात कसोटी क्रिकेटमध्ये २५०० धावाही पूर्ण केल्या. विशेष म्हणजे तो भारतासाठी सर्वात जलद २५०० कसोटी धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्याने ६२ डावात ही कामगिरी केली असून एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने ६९ डावांमध्ये २५०० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. याआधी ऋषभ पंतने भारतासाठी सर्वात वेगवान ५०० कसोटी धावा, १००० कसोटी धावा, १५०० कसोटी धावा आणि २००० कसोटी धावांचाही विक्रम केला आहे.

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये आज होणार हायव्होल्टेज लढत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह?

सर्वात जलद २५०० कसोटी धावा करणारे फलंदाज (डावांच्या दृष्टीने)

६२ डाव – ऋषभ पंत<br>६९ डाव – एमएस धोनी
८२ डाव – फारूख इंजिनीयर

हेही वाचा – Sarfaraz Khan Maiden Century: कष्टाचं चीज झालं! सर्फराझ खानने झळकावलं पहिलं कसोटी शतक, खास सेलिब्रेशनचा VIDEO होतोय व्हायरल

ऋषभ पंतने दिग्गज क्रिकेटर फारूख इंजिनीयरलाही टाकलं मागे

ऋषभ पंतने भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक ५० अधिक धावा करण्याच्या बाबतीत फारुख इंजिनियरची बरोबरी केली आहे. फारुख इंजिनिअरनेही आपल्या कसोटी कारकिर्दीत १८ वेळा ५० अधिक धावा केल्या. फारूख इंजिनीयर यांनी ही कामगिरी ८७ डावांमध्ये केली तर तरी पंतने केवळ ६२ डावांत हा पराक्रम केला आहे. याशिवाय, एमएस धोनी ३९ वेळा ५० अधिक धावा करत या यादीत आघाडीवर आहे.

कसोटीत भारतीय यष्टिरक्षकांमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा

३९ – एमएस धोनी (१४४ डाव)
१८ – फारोख अभियंता (८७ डाव)
१८ – ऋषभ पंत (६२ डाव)
14 – सय्यद किरमाणी (124 डाव)