Rishabh Pant on Team India: कार अपघातात जखमी झालेला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला तो मुकणार आहे. पंत जरी लवकरात लवकर बरा होत असला तरी भारताच्या गाबावरील कसोटी विजयाच्या नायकाला तंदुरुस्त होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. जर गोष्टी नियोजनानुसार झाल्या तर पंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याऐवजी जानेवारीमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेसाठी परत येऊ शकतो. याआधी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करून मॅच फिटनेस तसेच आत्मविश्वास मिळवावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ऋषभ पंत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये खूप प्रशिक्षण घेत आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक अजूनही त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. ऋषभ पंतने आपला शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर अपघातामुळे त्याला विश्वचषक २०२३मध्ये देखील खेळता आले नाही.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “अजून हे त्याचे सुरुवातीचे दिवस आहेत. तो नेटमध्ये फलंदाजी करतो हे चांगले आहे. पण त्याला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी अजून थोडा वेळ हवा आहे. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये परत जावे लागेल आणि आत्मविश्वास परत मिळवावा लागेल.’ कदाचित सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास, अफगाणिस्तानविरुद्ध पुनरागमन शक्य आहे. पण तरीही ते निश्चित नाही.”

क्रिकेट विश्वचषकानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसह इतर खेळाडूंना विश्रांती मिळणार आहे. ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी बंगळुरू येथे एका शिबिरासाठी एकत्र जमतील. त्यानंतर ते सर्व तीन टी२० तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी या मोठ्या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील.

विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी या दोन्ही मालिकांचे सामने येत असल्याने, ऋषभ पंत यापैकी एकामध्ये स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी परत येऊ शकतो. जर सर्व काही ठीक झाले, तर जानेवारीत भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेत पुनरागमन शक्य आहे. अन्यथा, त्याचे लक्ष मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर किंवा आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमनाकडे असेल. मात्र, तरीही त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी त्याची तंदुरुस्तीची चाचणी करण्यात येईल.

हेही वाचा: IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन करणार अनोखे ‘शतक’, मैदानात पाऊल ठेवताच रोहितच्या नावावर होणार खास विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात काय टीम इंडियाची परिस्थिती?

आज, एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २९व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सध्या भारतीय संघांच्या तीन विकेट्स पडल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant can play domestic cricket can return from india vs afghanistan series avw
Show comments