शुक्रवारी सकाळी ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर, तो आयपीएल २०२३ चा भाग असणार नाही अशी अपेक्षा आहे. आता त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत, डेव्हिड वॉर्नर हा कर्णधारपदाचा अनुभव असलेला सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. जो दिल्ली संघाचे नेतृत्व करु शकतो. दिल्ली संघाने याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एम्स-ऋषिकेशचे प्रमुख डॉ. कमर आझम म्हणाले, ”लिगामेंटच्या दुखापतीतून सावरण्यासाठी पंतला किमान तीन ते सहा महिने लागतील. आणि जर ते गंभीर असेल तर यास जास्त वेळ लागू शकतो. त्याच्या तपशीलवार दुखापतीच्या अहवालाच्या आधारे पुढील मूल्यांकन केले जाऊ शकते.”

ऋषभ पंत आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. आयपीएल २०२१ च्या सुरुवातीला त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. जर तो वेळेवर तंदुरुस्त होऊ शकला नाही, ज्याची शक्यता कमी आहे, अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स देखील नवीन कर्णधार आणि यष्टीरक्षकाच्या शोधात असेल. दिल्लीसाठी चांगली गोष्ट म्हणजे असे काही खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघ ही जबाबदारी सोपवू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलचा प्रचंड अनुभव आहे. पंतऐवजी कर्णधारपदाच्या शर्यतीत तो आघाडीवर असेल. त्याने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले असून २०१६ मध्ये संघाला विजेतेपदही मिळवून दिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर कर्णधारपदाची बंदी घातली असली, तरी ती आयपीएलमध्ये लागू होत नाही.

त्यामुळे कर्णधारपदाची माळ लवकरच त्याच्या गळ्यात पडू शकते. डेव्हिड वॉर्नर व्यतिरिक्त मिचेल मार्श, पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे आहेत. परंतु या सर्व खेळाडूंना वॉर्नर इतका अनुभव नाही. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच दिल्ली संघाच्या कर्णधार पदाचा प्रबळ दावेदार आहे. म्हणून त्याचे नाव सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा – ला लिगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात बेन्झिमाची चमक

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “ऋषभ पंतचा नुकताच अपघात झाला आहे. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता काहीही बोलणे घाईचे आहे. त्याला आराम करु द्या आणि बरे होण्याची वाट पहा. तो बरा झाल्यावर त्याला एनसीएमध्ये फिटनेस चाचणीसाठी पाठवले जाईल.” डॉक्टरांच्या मते पंतला बरे होण्यासाठी सहा महिने लागू शकतात. बीसीसीआयची वैद्यकीय टीम डॉक्टरांच्या संपर्कात आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मॅक्स हॉस्पिटल डेहराडूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष याज्ञिक म्हणाले की, पंतला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. आशिष याज्ञिक पुढे म्हणाले, “त्याचे मूल्यमापन केले जात आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. काही चाचण्यांनंतरच आम्ही अधिक सांगू शकतो. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांची टीम त्याच्याशी बोलत असून, तो दुखापतींबद्दल काय सांगतोय, याच्या आधारे त्याचे मूल्यमापन केले जात आहे. प्रथमदर्शनी आम्हाला कोणतीही गंभीर दुखापत आढळलेली नाही. ऑर्थोपेडिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant car accident pant out of ipl 2023 david warners name is being discussed for delhi capitals captaincy vbm