क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्यावर उत्तरांखमधील देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असले तरी ऋषभ पंतची प्रकृती कशी आहे? त्याला कोठे लागले आहे? किती जखमा आहेत? असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुनिल नागर यांनी अधिक माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Rishabh Pant Accident Video: पंतचा अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर होता उभा

ऋषभ पंतची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. नागर यांनी सांगितले आहे. तसेच पंतचे कोणतेही हाड मोडलेले नसून चेहऱ्यावर काही जखमा झालेल्या आहेत. त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

“रुग्णालयात दाखल केले तेव्हा तो पूर्णपणे शुद्धीवर होता. पंतला त्याच्या आईला सरप्राईज द्यायचे होते. त्यामुळे तो घरी जात होता. त्याच्या चेहऱ्यावर दोन जखमा आहेत. मी त्याला पुढील उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात पाठवले. तेथे प्लास्टिक सर्जन असल्यामुळे मी हा निर्णय घेतला,” अशी माहिती डॉ. नागर यांनी दिली.

हेही वाचा >> अपघातानंतर ऋषभ पंतची काय स्थिती होती? त्याला कारमधून कसे बाहेर काढले? मदत करणाऱ्या बसचालकाने सांगितला घटनाक्रम

“त्याच्या कोणत्याही हाडाला इजा झालेली नाही. फक्त गुडघ्याच्या लिगामेंट्सला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला झालेली जखम किती गंभीर आहे, हे पुढील चाचण्यांनंतरच समजू शकेल. लिगामेंट्सला झालेली दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी साधारण २ ते ६ महिने लागू शकतात,” असेही नागर यांनी सांगितले.

दरम्यान, ऋषभ पंत आपल्या मर्सिडीज कारने दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ १०८ क्रमांकावर फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant car accident update two cut on face no bone injury prd
Show comments