Rishabh Pant celebrated Mahendra Singh Dhoni’s 42nd birthday: टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. चाहत्यांचा लाडका माही आज ४२ वर्षांचा झाला आहे. अशात भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभने एमएस धोनीचा ४२ वा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. एमएस धोनीपासून दूर राहूनही पंतने वाढदिवस साजरा केला आहे. पंतने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये दोन फोटोंचा समावेश आहे. फोटोंमध्ये पंत केकेसोबत उभा असलेला दिसत आहे. केक कापण्यासाठी त्याच्या हातात चाकूही दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई. तू जवळ नाहीस, मी तुझ्यासाठी केक कापला. वाढदिवसाच्या शुभेच्छा.” याच्या पुढे त्याने एमएस धोनीलाही टॅग केले.

ऋषभ पंतच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया –

पंतची ही इन्स्टाग्राम पोस्ट चाहत्यांना खूप आवडत आहे. काही वेळापूर्वी शेअर केलेल्या पोस्टला सुमारे दोन लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचवेळी सर्वांनी आपापल्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून दिल्या. एका युजरने कमेंट केली की, “ऋषभ पंत तू खूप गोड आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “हा आमचा ऋषभ पंत आहे. लव्ह यू ऋषभ भैया आणि माही भाई. माही सर वाढदिवसाच्या शुभेच्छा.” पंतच्या या पोस्टवर सर्व चाहत्यांनी एमएस धोनीला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – VIDEO: पंजाबचे क्रीडा मंत्री वहाब रियाझ ‘या’ कृत्यामुळे होतायेत ट्रोल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ऋषभ पंत वेगाने बरा होतोय –

ऋषभ पंत हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपस्थित आहे, जिथे तो रिहॅबच्या प्रक्रियेमधून जात आहे. पंत वेगाने बरा होत आहे. मात्र, त्यांच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ३० डिसेंबर २०२२ रोजी पंतचा कार अपघात झाला होता. आता पंत कधी मैदानात परततो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant celebrated mahendra singh dhonis 42nd birthday in a unique way vbm