Rishabh Pant Wicket Controversy Video Viral in IND vs NZ 3rd Test : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने मुंबई कसोटीत भारतावर २५ धावांनी विजय मिळत ३-० ने मालिका खिशात घातली. या सामन्यात ऋषभ पंतला वादग्रस्त पद्धतीने आऊट दिल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. एजाज पटेलच्या चेंडूवर बचावात्मक शॉट खेळरण्याचा प्रयत्न करताना ऋषभ पंत चुकला. यावेळी चेंडू बॅटच्या अगदी जवळ पॅडला लागला आणि टॉम ब्लंडेलच्या हातात गेला. यानंतर एजाज पटेलने जोरदार अपील केले, पण मैदानावरील पंचांनी त्याला बाद घोषित केले नाही.

कर्णधार टॉम लॅथमने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ब्लंडेलला डीआरएस घेण्याबद्दल विचारले. कारण चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला याबद्दल शंका होती. मात्र, एजाज पटेलने आपल्या कर्णधाराला डीआरएस घेण्यास सांगितले. डीआरएस घेताच निर्णय थर्ड अंपायरकडे गेला. चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी स्निकोमीटरमध्ये स्पाइक करत असल्याचे तिसऱ्या पंचाने पाहिले. त्यानंतर न्यूझीलंड कॅम्पमध्ये आनंदाची लाट उसळली. मात्र, टीम इंडियाच्या चाहत्यांच्या निराशा पसरली. आता ऋषभ पंतच्या बाद होण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Rohit Sharma Statement on India Series Defeat IND vs NZ Said I wasnt at my best with both bat and as a captain
IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
WTC Points Table India Lost 1st Spot After Consecutive 3 Test Defeat in India vs New Zealand
WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित

ऋषभ पंत आऊट की नॉट आऊट?

यावेळी ऋषभ पंतला वाटत होते की, चेंडू बॅटला नव्हे तर पॅडला लागला आहे. थर्ड अंपायरलाही असे वाटले की परावर्तनामुळे, चेंडू बॅटजवळून गेल्यावर स्पाइक दिसत आहे, परंतु प्रकरण इतके किचकट होते की, किवी संघाला या संशयाचा फायदा मिळाला आणि पंतला बाद घोषित केले. यावेळी पंतने मैदानी अंपायरला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही निष्पन्न झाले नाही आणि त्याला माघारी जावे लागले. यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की ऋषभ पंतला बाद नसताना बाद घोषित करण्यात आले. याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास

अर्थात ऋषभ पंत बाद झाला पण त्याने आपल्या फलंदाजीने सामना नक्कीच टीम इंडियाच्या बाजूने झुकवला होता. पंतने शानदार फलंदाजी करत ५७ चेंडूत ६४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि १ षटकारही लगावला. विशेष म्हणजे टीम इंडियाने एकेकाळी २९ धावांवर ५ विकेट गमावल्या असताना त्याने संघाची धुरा चोखपणे सांभाळली होती आणि विजयाकडे घेऊन चालला होता. पण तो विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही, त्यामुळे त्याची अर्धशतकी व्यर्थ ठरली.

Story img Loader