अखरेच्या टी-२० सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात केली. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं १४७ धावांचं आव्हान भारताने ऋषभ पंत आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. पंतने ४२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ६५ धावा केल्या. आतापर्यंत कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाहीये.

याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये २२ व्या वर्षाआधी दोन अर्धशतकं झळकावणारा ऋषभ पंत पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीनेही ऋषभ पंतला चांगली साथ दिली, ऋषभने ४५ चेंडूत ५९ धावा केल्या.