Rishabh Pant Record Breaking Fifty in Sydney Test: भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत ऋषभ पंतचा जलवा पाहायला मिळाला. ऋषभ पंतने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची शाळा घेतली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ऋषभ पंतची तुफानी फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर येताच पंतने स्कॉट बोलँडला षटकार ठोकला. यानंतरही पंत इथेच थांबला नाही, त्याने प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला चोप दिला. दुसऱ्या डावात पंतने अवघ्या २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने नवा विक्रम रचला आहे.

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने वादळी फलंदाजी करत अवघ्या २९ चेंडूत अर्धशतक झळकावले. आता पंत ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा प्रतिस्पर्धी संघाचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन ब्राउन आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्स यांच्या नावावर होता, ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये ३३ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. पण आता ऋषभ पंतने आता यांना मागे टाकलं आहे.

Harshit Rana became the first indian to make his T20I debut as a concussion substitute in IND vs ENG
Harshit Rana : हर्षित राणाने घडवला इतिहास! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Harshit Rana concussion substitue replaces shivam dube
Harshit Rana Concussion : फलंदाजाच्या जागी गोलंदाज कसा येऊ शकतो? भारताच्या विजयानंतर कनक्शन सबस्टिट्यूटवरुन पेटला वाद
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

हेही वाचा – IND vs AUS: “ओए कॉन्टास, काय झालं रे..?” यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला चिडवलं, चुकीचं नाव घेत अशी घेतली फिरकी; VIDEO व्हायरल

ऋषभ पंत फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा टीम इंडियाने ७८ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर ऋषभ पंतने दमदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. या सामन्यात ऋषभ पंतने ३३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी पंतने २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. जे भारताच्या फलंदाजाने झळकावलेले सर्वात जलद अर्धशतक आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “मी दोन मुलांचा बाप आहे, मला कळतं…”, रोहित शर्मा निवृत्तीच्या चर्चांबद्दल बोलताना वैतागला; नेमकं काय म्हणाला?

ऋषभ पंतचं कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी २०२२ मध्ये पंतने श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये केवळ २८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा पंत हा पहिला भारतीय फलंदाज आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल आणि शार्दुल ठाकूर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३१ चेंडूत अर्धशतकं झळकावली आहेत. १९८२ मध्ये टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी भारतासाठी पहिल्यांदाच सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

हेही वाचा – IND vs AUS : प्रसिध कृष्णाचं जबरदस्त कमबॅक! ॲलेक्स कॅरीचा उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज

२८ चेंडू – ऋषभ पंत वि श्रीलंका (बंगळुरू २०२२)
२९ चेंडू – ऋषभ पंत वि ऑस्ट्रेलिया (सिडनी २०२५)
३० चेंडू – कपिल देव वि पाकिस्तान (कराची १९८२)
३१ चेंडू – शार्दुल ठाकूर वि इंग्लंड (ओव्हल २०१९)
३१ चेंडू – यशस्वी जैस्वाल वि बांगलादेश (कानपूर २०२४)

Story img Loader