Rishabh Pant Reaction on Car Accident : कार अपघातानंतर भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आगामी आयपीएलमध्ये तो मैदानात दिसण्याची शक्यता आहे. पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याच्या कारला आग लागली होती. या अपघातावर बोलताना ऋषभ पंत म्हणाला की, त्यावेळी मला वाटले होते की या जगातील माझा वेळ संपला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट (अस्थिबंधन) फाटला होता. त्याचबरोबर उजव्या मनगटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरील जखमा बऱ्या करण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ऋषभ पंतने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्या त्रासदायक अनुभवाविषयी सांगताना म्हणाला माझे आयुष्य जवळजवळ संपले होते.

ऋषभ पंत पुढे म्हणाला, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असे वाटले होते की या जगातील माझा वेळ संपला आहे. अपघातादरम्यान झालेल्या दुखापतींबद्दल मला माहिती होती, परंतु मी नशीबवान होतो. कारण त्या अधिक गंभीर असू शकल्या असत्या. मला वाटले मला कोणीतरी वाचवले आहे. मी डॉक्टरांना विचारले की मला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल आणि त्यांनी सांगितले की १६-१८ महिने लागतील. हा रिकव्हरीचा वेळ कमी करण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतील हे मला माहीत आहे.”

हेही वाचा – Sarfaraz Khan : ‘…उत्सव की तैयारी करो’, सरफराजच्या निवडीनतंर सूर्यकुमार यादवने शेअर केली खास इन्स्टा स्टोरी

ऋषभने भारतीय नागरिकांना केले विशेष आवाहन –

त्या दुर्घटनेनंतर एका वर्षाहून अधिक काळ झाल्यानंतर पंत आता बरा झाला असून लवकरच तो मैदानात परतण्याची शक्यता आहे. सोमवारी (२९ जानेवारी) त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन लोकांना रुग्णवाहिकेबाबत विशेष आवाहनही केले.

हेही वाचा – IND vs ENG Test : ‘…तर इंग्लंड ५-० ने मालिका जिंकेल’, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाला इशारा

ऋषभ पंतने एक्सवर लिहिले, “मला आशा आहे की भारतातील लोक रुग्णवाहिकांसाठीही असेच करतील. फक्त रुग्णवाहिकेला रस्ता देऊन किती जीव वाचवले जाऊ शकतात हे तुम्हाला माहीत नाही. आपण वैयक्तिकरित्या हा पुढाकार घेऊ शकतो आणि रुग्णवाहिकेला रस्ता देऊन जीव वाचवू शकतो. जे आधीच हे करत आहेत त्यांचे आभार.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant has made a special appeal to the indian people while reacting to the car accident vbm
Show comments