Cricketer Rishabh Pant Accident Updates: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर मर्सिडीज कारला भीषण आग लागली. शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे रुरकीच्या गुरुकुल नरसन परिसरात ही घटना घडली. स्थानिक लोकांनी तात्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केले. आता येथून ऋषभ पंतला डेहराडून मॅक्स हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातानंतर ऋषभ पंतचे मोठे प्रतिक्रिया आली आहे. हा अपघात कसा झाला आणि तो कसा वाचला हे त्यांनी सांगितले. जर पंत गाडीतून उतरू शकला नसता आणि थोडा उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. कारण या घटनेनंतर कारला मोठी आग लागली होती.

आणखी वाचा – ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

विंडो स्क्रीन फोडून पंत बाहेर आला –

ऋषभ पंतने सांगितले की, तो स्वतः कार चालवत होता. गाडी चालवताना त्याला झोप लागली. यामुळेच कार दुभाजकावर आदळली आणि मोठा अपघात झाला. अपघातानंतर तो विंडो स्क्रीन फोडून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले.

ऋषभ पंतच्या डोक्याला दुखापत –

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या शरीरावर कोणत्याही गंभीर जखमा नाहीत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची शक्यता आहे. सध्या पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. बाकीच्या दुखापती तपासानंतरच बरोबर समजतील.

हेही वाचा – Pele Passes Away: पेलेंनी खरोखरच युद्ध थांबवले होते का? जाणून घ्या काय घडलं होतं ५३ वर्षांपूर्वी

पंतला एनसीएमध्ये रिपोर्ट करण्यास सांगितले होते –

ऋषभ पंतच्या कार अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. पंतच्या रुग्णालयात दाखल झालेल्यांचे फोटोही पाहता येतील. कार अपघातानंतर तिथल्या लोकांनी १०८ च्या मदतीने ऋषभ पंतला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. आधीच अनफिट असलेल्या पंतला बीसीसीआयने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) रिपोर्ट करण्यास सांगितले होते.

हेही वाचा – Rishabh Pant Car Accident: “गरज पडल्यास त्याच्यासाठी…”; उत्तराखंडच्या CM चे निर्देश! जाणून या अपघातासंदर्भातील १० अपडेट्स

ऋषभ पंतची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

३३ कसोटी खेळल्या – २२७१ धावा – ५ शतके
३० एकदिवसीय सामने खेळले – ८६५ धावा – १ शतक
६६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले – ९८७ धावा – ३ अर्धशतके

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant has talked about how his car met with an accident and how he got out vbm