Mrinank Singh Accuse Rishabh Pant: राष्ट्रीय स्तरावर हरियाणाच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मृणांक सिंह याला नुकतीच नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी पोलिसांनी अटक केली होती. यापूवी त्याने जुलै २०२२ मध्ये दिल्लतल्या ताज पॅलेस हॉटेलची ५.५३ लाख रुपयांना फसवणूक केली होती. त्यावेळेस त्याने दावा केला होता की, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि आता यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक झाली आहे. पंतने केलेल्या आरोपानुसार २०२०-२१ मध्ये मृणांकने पंतला १.६३ कोटींचा गंडा घातला होता. मात्र आता अखेरीस या एकूण प्रकरणावर मृणांकने सुद्धा आपली बाजू स्पष्ट करत वर पंतवरच प्रत्यारोप केले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऋषभ पंतचे आरोप काय होते?

पोलिसांनी अटक केल्यावर मृणांक सिंगने, भारताचा क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत हाच ‘खोटे आरोप’ करत असल्याचे म्हणत पलटवार केला आहे. पंतने केलेल्या आरोपानुसार, सिंगने लक्झरी घड्याळ आणि दागिन्यांच्या व्यवसायाच्या नावाखाली २०२०-२१ या कालावधीत पंतची १. ६ कोटींची फसवणूक केली. पंतने सिंगवर विश्वास ठेवून त्याची घड्याळे दिली, पण त्या बदल्यात मिळालेला चेक बाउन्स झाला आणि मग त्याने या प्रकरणाविषयी माहिती दिली.

मृणांक सिंहचा पलटवार काय होता?

पोलिस कोठडीत असलेल्या सिंगने मात्र या प्रकरणाचा वेगळाच अँगल सांगितला आहे. इंडिया टुडेशी एका खास चर्चेत, सिंग स्वतःचा बचाव करताना सांगत होता की, “ऋषभ पंत आणि माझा एकत्र व्यवसाय होता. आम्ही एकत्र एक काम सुरू केले मात्र ते फारच अयशस्वी ठरले. त्यानंतर ऋषभ पंतला व्याजाचे पैसे हवे होते जे मी देऊ शकलो नाही. ही कायदेशीर लढाई तीन वर्षे चालू होती, ज्याचा निकाल माझ्या बाजूने लागला होता”

मृणांक सिंहला अटक करणाऱ्या पोलिसांनी काय सांगितलं?

मृणांक सिंग हाँगकाँगला जाण्यासाठी विमानात बसणार असतानाच त्याला अटक करण्यात आली. अतिरिक्त डीसीपी रविकांत कुमार यांनी खुलासा केला, “सोमवारी, तो हाँगकाँगला जाण्यासाठी विमान पकडण्याचा प्रयत्न करत असताना, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि आमच्याकडे सोपवले.” त्याला अटक केली जात असतानाही, त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि असा दावा केला की त्याचे वडील अशोक कुमार सिंग ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतीय क्रिकेट संघासाठी खेळले होते आणि सध्या एअर इंडियामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत.

मृणांक सिंहचं आलिशान आयुष्य

सिंगच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अनेकदा लक्झरी कार, पंचतारांकित हॉटेल्स आणि ब्रँडेड वस्तू आणि क्रिकेटरच्या वेशात किंवा गेम खेळतानाचे अनेक फोटो दिसतात. पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेकदा आपला फोन बंद ठेवतो तर ओळखीच्या व नात्यातील लोकांना त्याने असे भासवून दिले आहे की तो आता दुबईला स्थायिक झाला आहे.

हे ही वाचा<< “एक वडील म्हणून..”, अक्षय कुमारची शिखर धवनसाठी भावुक पोस्ट; म्हणाला, “आपल्या मुलांना न बघता येणं हे.. “

यापूर्वी त्याने मृणांक सिंह याने तो कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव रचून देशभरात अनेक आलिशान हॉटेलांची, हॉटेल मालकांची, त्यांच्या व्यवस्थापकांची आर्थिक फसवणूक केली असल्याचं पोलीस तपासांत उघड झाले होते.