India national cricket team vs Bangladesh national cricket team match scorecard : भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. चेन्नई येथे सुरू असलेल्या सामन्यात भारत नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरला पण संघाची सुरूवात फारच खराब झाली. ऋषभ पंत आणि यशस्वीच्या जोडीने भारताचा डाव पुढे नेला आहे. पण पहिल्या सत्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. ऋषभ पंत आणि बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास मैदानातचं एकमेकांशी भिडले. टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान ऋषभ पंत क्रीजवर होता, तेव्हा त्याच्या आणि बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास यांच्यात एका मुद्द्यावरून जोरदार वाद झाला.

ऋषभ पंतने तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. पण ऋषभ पंत आपल्या नेहमीच्या आणि जुन्या अंदाजात फटकेबाजी करताना दिसत आहे. हसन महमूदच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने पहिल्या तासातच तीन विकेट गमावल्या. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले, यानंतर ऋषभ पंत मैदानावर फलंदाजीला आला आणि त्याने आपल्या अंदाजात फलंदाजी सुरू केली. ऋषभ पंत केवळ चौकार मारण्याचा प्रयत्न करत नव्हता, तर संधी मिळताच एक धाव घेण्याचाही प्रयत्न करत आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
pager blast lebanon reuters
Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Salman Khan father Salim Khan
Salman Khan : “लॉरेन्स बिश्नोई को भेजूं क्या?” सलमान खानच्या वडिलांना धमकी; स्कूटरवरून दोघे आले अन्…, गॅलेक्सीच्या बाहेर काय घडलं?
Ajit Doval
Ajit Doval : अमेरिकेतील न्यायालयाचं भारत सरकार व अजित डोवालांना समन्स, नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा – Hasan Mahmud: कोण आहे हसन महमूद? रोहित, विराट, शुबमनला बाद करत टीम इंडियाला टाकलं अडचणीत

“बॉल माझ्याकडे कशाला फेकतोस…”, ऋषभ पंतनं बांगलादेशच्या लिटन दासला भरला दम

भारताच्या पहिल्या डावात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद १६व्या षटकात चेंडू टाकण्यासाठी आला. तस्किन अहमदने या षटकातील तिसरा चेंडू भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वालला टाकला. यानंतर यशस्वी आणि ऋषभ यांनी मिळून एक धाव घेतली. एक धाव घेतल्यानंतर बांगलादेशी क्षेत्ररक्षकाचा एक थ्रो ऋषभ पंतच्या पॅडला लागला. ऋषभ पंतच्या पॅडला स्पर्श केल्यानंतर चेंडूची दिशा बदलते, ज्यावर तो दुसरी धाव घेण्यासाठी धावतो. बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास यावर नाराज दिसला.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्मा टी-२० मधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? कर्णधाराने दिले उत्तर

लिट्टन दास आधी ऋषभ पंतशी यावर बोलताना दिसला कारण असा चेंडू लागल्यावर सहसा धाव घेत नाही. या प्रकरणावरून ऋषभ पंत आणि लिटन दास यांच्यात वाद सुरू झाला. यादरम्यान पंत त्याला म्हणतो, तू त्याच्याकडे चेंडू फेक ना माझ्या दिशेने चेंडू का फेकतोय… ऋषभ पंत आणि लिट्टन दासचा हा व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहे.