Rishabh Pant Nathan Lyon Chat on IPL Auction Video Viral: पर्थमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघ १५० धावा करत सर्वबाद झाला. पण हा कसोटी सामना सुरू असतानाच २४ आणि २५ तारखेला आयपीएलचा महालिलाव जेद्दाहमध्ये पार पडणार आहे. या लिलावात भारत-ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू उतरणार आहेत. याबाबतच ऋषभ पंत आणि नॅथन लायन पंतच्या डावादरम्यान बोलताना दिसले ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

पर्थ कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पर्थमध्ये भारताची सलामी जोडी विशेष काही करू शकली नाही. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल लवकर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहलीही स्वस्तात बाद झाल्याने संघाला मोठा धक्का बसला. पण पंत काही वेगळ्याच विचारात आला होता. संघ दडपणाखाली असताना पंतने सावध खेळ केला, पण खेळपट्टी आता फलंदाजीसाठी योग्य आहे असे वाटताच त्याने फटकेबाजी केली.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

हेही वाचा – KL Rahul Wicket Controversy: केएल राहुल आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांनी घाईत दिला निर्णय अन् राहुलच्या विकेटमुळे सुरू झाला नवा वाद

पंतने ३७ धावांची खेळी करत कांगारू संघावर दबाव आणण्याच प्रयत्न केला. यादरम्यान ऋषभ पंत फलंदाजी करत होता तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या नॅथन लायन त्याच्यासमोरून जाताना त्याला आयपीएल लिलावाबाबत प्रश्न विचारताना दिसला.

हेही वाचा – IND vs AUS: विराट कोहली स्वत:च्या चुकीमुळे ‘असा’ झाला बाद, चेतेश्वर पुजाराने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

नाथनने पंतला विचारले की, तू मेगा ऑक्शनमध्ये कुठे जाणार आहेस? ज्याला उत्तर देताना पंत म्हणाला की, मला काही कल्पना नाही. म्हणजेच आयपीएल मेगा लिलावात तुला कोणत्या संघात जायचं आहे, हे नाथनला विचारायचे होते. दिल्ली कॅपिटल्सने यावेळी पंतला रिलीज केले आहे. त्यानंतर हा यष्टीरक्षक फलंदाज मेगा लिलावाचा भाग आहे. त्यामुळे ऋषभ पंतची कामगिरी पाहता त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Virendra Sehwag Son: जैसा बाप वैसा बेटा! सेहवागच्या लेकाचे वादळी द्विशतक, आर्यवीरने ३४ चौकार २ षटकारांसह केली तुफानी फटकेबाजी

हेही वाचा – IND vs AUS: अनुभवी अश्विन आणि जडेजाऐवजी पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची निवड का करण्यात आली? काय आहे कारण?

आयपीएल मेगा लिलावात ऋषभ पंतला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. पंतचा सध्याचा फॉर्मही चांगला आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही पंतने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातही पंतकडून संघाला खूप अपेक्षा आहेत. पंतने पहिल्याच सामन्यात संघाला गरज असताना महत्त्वपूर्ण ३७ धावांची खेळी केली. गेल्या आयपीएलचा हंगामही पंतसाठी चांगला होता, त्यामुळे आता मेगा लिलावापूर्वी पंत यावेळी लिलावाचे सर्व विक्रम मोडू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

Story img Loader