IND vs AUS 4th Test Day 4 Updates in Marathi: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या धावांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीने मिळून एक कमालीचा रनआऊट केला. मिचेल स्टार्कही पंतच्या थ्रोवर मागे न पाहता थेट मैदानाबाहेर निघून गेला. ऋषभ पंतच्या चपळाईने इथे भारताला विकेट मिळवून दिली.

अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीचा थ्रो आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतची चपळाई भारतीय संघासाठी वरदान ठरली आणि बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताला आठवी विकेट मिळाली. ऋषभ पंतने केलेल्या उत्कृष्ट थ्रोमुळे मिचेल स्टार्कला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. भारतासाठी ही एक मोठी विकेट होती, कारण स्टार्क देखील चांगली फलंदाजी करतो आणि दुसऱ्या टोकाला पॅट कमिन्स होता, जो अतिशय वेगाने धावा करत होता.

Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS Boxing Day Test Virat Kohli and Sam Konstas argument video viral
IND vs AUS : विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झाली धक्काबुक्की! पंचांसह ख्वाजाला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
IND vs AUS 3rd Test Match Drawn in Gabba
India vs Australia 3rd Test Drawn: गाबा कसोटीत पावसाचाच खेळ, कसोटी अनिर्णित; मालिका बरोबरीतच

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, दिग्गजांना मागे टाकत ठरला जगातील नंबर वन गोलंदाज

जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ५९वे षटक टाकण्यासाठी आला. त्याचा पहिला चेंडू मिचेल स्टार्कने स्क्वेअर लेगच्या डाव्या बाजूला खेळला आणि एक धाव घेतली. मात्र, दुसरी धाव घेता येईल असे त्याला वाटले. कमिन्सही जागेवर पोहोचून धाव घेण्यासाठी जाणार पण तितक्यात त्याने पाहिलं की नितीशच्या हातात चेंडू आहे आणि त्याने स्टार्कला थांबवण्यासाठी हात दाखवला. पण तोपर्यंत स्टार्क पुढे आला आणि नितीशने चेंडू ऋषभ पंतच्या दिशेने फेकला. पंत मागून पटकन धावत पुढे आला आणि एक ग्लोव्ह काढून टाकत त्याने चेंडू टिपला.

हेही वाचा – IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सोडले ३ साधे झेल, रोहित शर्माने मैदानातच संताप व्यक्त करत दिली अशी प्रतिक्रिया; पाहा VIDEO

स्ट्राईकर एन्डला कमिन्स सुरक्षित होत. पण पंतने चेंडू घेऊन नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने फेकला आणि चेंडू थेट जाऊन विकेट्सवर आदळला, तिथे बुमराह उभा होता आणि त्याने पाहताच स्टार्क बाद झाल्याचे अॅक्शनमधून सांगितले. तर पंचांनी बाद देण्याआधीच स्टार्कही पॅव्हेलियनकडे जाण्यासाठी निघाला.

हेही वाचा – IND vs AUS: सिराजच्या विकेटवरून मोठा ड्रामा, कमिन्सने तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर घेतला रिव्ह्यू; मैदानावरील पंचांनी पाहा काय केलं?

ऋषभ पंत प्रथम वेगाने धावत येऊन थ्रो पकडला आणि मिचेल स्टार्क नॉन स्ट्राइक एंडवरून पुढे आल्याचे पाहून त्याने पटकन नॉन स्ट्राइकवर थ्रो मारला, जो थेट स्टंपवर आदळला. स्टार्क खूप मागे राहिल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. अशा प्रकारे भारताला आठवी विकेट मिळाली. मिचेल स्टार्क ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Story img Loader