IND vs BAN Test Rishabh Pant Viral Video: भारत-बांगलादेशमधील चेन्नई कसोटीत ६३३ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतने शानदार शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या शतकासह ऋषभ पंतने इतिहास घडवला आहे. भारतीय संघासाठी संयुक्तपणे कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके करणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. विशेष बाब म्हणजे त्याने देशाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनीची बरोबरी केली आहे. धोनीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ६ शतके आहेत. चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून पंतने आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ६ शतके झळकावली आहेत. पण या शतकापूर्वी लंच ब्रेकमध्ये ऋषभ पंतने नेमकं काय केलं जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंतने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ८२ धावा केल्या होत्या. त्यानंतर लंचब्रेक झाल्याने पहिले सत्र संपले. या लंचब्रेकनंतर मैदानावर येत ऋषभ पंतने मोठे फटके मारत शतकाजवळ पोहोचला आणि त्यानंतर त्याने दोन धावा घेत शतक पूर्ण केले. पण या शतकापूर्वी लंच ब्रेकमधील एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs BAN: भारत बांगलादेश कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पंचांनी लवकर का संपवला? मैदानात नेमकं काय घडलं, जाणून घ्या

ऋषभ पंतचा सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंत ब्रेक दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये हात जोडून बॅट, हेल्मेट आणि ग्लोव्ह्जची पूजा करताना दिसत आहे. पंतने लंचब्रेकनंतर मैदानावर येण्यापूर्वीचा हा व्हीडिओ आहे. मैदानात येण्यापूर्वी पंत बॅटसमोर हात जोडून उभा राहिला. यानंतर तो मैदानात आला आणि बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई करत शतक पूर्ण केले. ६३३ दिवसांनंतर कमबॅक केल्यानंतर पंतने चांगली बॅट ग्लोव्हज समोर नतमस्तक होत त्याचे आभार मानले, अशा काही जणांनी कमेंट केल्या आहेत. १०९ धावांच्या खेळीत त्याने अनेक आकर्षक शॉट्स खेळले. यामध्ये त्याने आपल्या नेहमीच्या स्टाईलमधील एका हाताने षटकार मारला.

हेही वाचा – VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?

गिल-पंतची भागीदारी

दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. पंतने शुबमन गिलसह फटकेबाजी करत चांगली भागीदारी रचली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी झाली. पंतसोबत गिलनेही शतक झळकावले. ऋषभ पंतने कसोटीतील ५८ डावात ६ शतके झळकावली आहेत. माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने कसोटीतील १४४ डावांमध्ये ६ शतके झळकावली आहेत.

ऋषभ पंतने या सामन्याच्या पहिल्या डावात ३९ धावा केल्या होत्या. या धावाही सामन्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या होत्या. पंत फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या ३ विकेटवर ३४ धावा होती. विराट कोहली आणि रोहित शर्मासह शुबमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतले होता. यानंतर पंतने येऊन यशस्वी जैस्वालच्या साथीने डावाची धुरा सांभाळली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant praying his bat gloves helmet before smashing historic century in ind vs ban chennai test video viral bdg