Rishabh Pant requested Venkatesh College: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत अजूनही क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गेल्या वर्षी त्याचा भीषण कार अपघात झाला होता. या कारणास्तव, तो या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये मैदानात उतरू शकणार नाही. टीम इंडियासाठीही हा मोठा धक्का आहे. नुकतेच पंत यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याने एनसीएमध्ये रिहॅबही सुरू केले आहे. या रिकव्हरी दरम्यान, पंतने सोशल मीडियावर एक अतिशय दुःखद पोस्ट केली आहे. हे त्याच्या आरोग्याबद्दल नाही तर सॉनेट क्रिकेट क्लबबद्दल आहे, ज्याने त्याला एक यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

व्यंकटेश कॉलेजमधून सॉनेट क्लब हटवण्याची नोटीस बजावली –

वास्तविक, हे प्रकरण दिल्लीतील व्यंकटेश कॉलेजशी संबंधित आहे, ज्यामध्ये सॉनेट क्रिकेट क्लब देखील उपस्थित आहे. या क्लबचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी अकादमीतून अनेक मोठे खेळाडू टीम इंडियाला दिले. आता ही अकादमी व्यंकटेश्वरा कॉलेजमधून काढली जात आहे. त्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ऋषभ पंतने या क्लबमध्ये खूप मेहनत घेतली आणि आज तो एक यशस्वी क्रिकेटपटू बनला आहे.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
gurpatwant singh pannu in us
Gurpatwant Singh Pannu: भारताची मागणी अमेरिकेनं फेटाळली, गुरुपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यास स्पष्ट नकार!
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

ऋषभ पंत हा मूळचा उत्तराखंडचा आहे. पण त्याने दिल्लीतील सॉनेट क्रिकेट क्लबमधूनच या खेळातील बारकावे शिकून घेतले. प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी अकादमीतून अनेक मोठे खेळाडू टीम इंडियाला दिले. आता ही अकादमी व्यंकटेश्वरा कॉलेजमधून काढली जात आहे. त्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे पंत खूप दुःखी झाला आहेत. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “माझ्या क्लबची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटते, जिथून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बाहेर आले. त्याच सॉनेट क्लबला बाहेर काढणे निराशाजनक आहे. या क्लबने माझ्यासारखे अनेक खेळाडू घडवले आहेत. ते आपल्या सर्वांसाठी घरासारखे आहे.”

नेहमी नियमांचे पालन केले –

ऋषभ पंतने पुढे लिहिले की, “आम्ही नेहमीच कॉलेजने बनवलेल्या नियमांचे पालन केले आहे. मी व्यंकटेश्वरा कॉलेजच्या प्रशासकीय मंडळांना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करू इच्छितो, कारण सॉनेट क्लब हा केवळ एक क्लब नाही, तर तो एक वारसा संस्था आणि अनेक नवोदित क्रिकेटपटूंचे घर आहे. आता यावर कॉलेज पुढे काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.”

हेही वाचा – IPL 2023: टीम डेव्हिडने रोहित शर्माला दिले परफेक्ट बर्थडे गिफ्ट; मुंबई इंडियन्सने सेलिब्रेट केला हिटमॅनचा वाढदिवस, पाहा VIDEO

आकाश चोप्रानेही व्यक्त केली नाराजी –

पंत व्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रानेही याबद्दल ट्विट केले आहे आणि लिहिले आहे की, “हे धक्कादायक आहे. सॉनेट क्रिकेट क्लब ही अशी एक संस्था आहे, जी अनेक दशकांपासून भारतीय क्रिकेटच्या सेवेत अथक परिश्रम करत आहे. डझनहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू. असंख्य प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दिले आहेत. क्लबची हकालपट्टी करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मी दिल्लीच्या व्यंकटेश्वरा महाविद्यालयाला नम्र विनंती करतो.”

Story img Loader