Rishabh Pant reject Delhi captaincy in Ranji Trophy 2024-25 : रणजी ट्रॉफी २०२४-२५ ची दुसरी फेरी २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू त्यांच्या राज्य संघाकडून खेळताना दिसणार आहेत. यामध्ये एक नाव समाविष्ट आहे ते म्हणजे स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे, जो राजकोटच्या मैदानावर सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाकडून खेळणार आहे. दरम्यान, पंतला दिल्ली रणजी संघाच्या कर्णधारपदाची ऑफरही देण्यात आली होती, मात्र त्याने ही ऑफर नाकारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंतने कर्णधारपदाचा प्रस्ताव नाकारला –

दिल्ली क्रिकेट असोसिएशनने अद्याप पुढील फेरीसाठी संघ जाहीर केला नसला, तरी पंतच्या नावाचा त्यात समावेश निश्चित आहे. कारण ऋषभ पंतने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास संमती दिली आहे. आता तो २०१८ नंतर प्रथमच रणजी ट्रॉफीमध्ये सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, यष्टीरक्षक फलंदाजाने संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिला आहे.

ऋषभ पंतने का नाकारला प्रस्ताव?

त्यामुळे आता अध्यक्ष गुरशरण सिंग यांच्या अध्यक्षतेखालील दिल्ली क्रिकेट असोसिएशनची निवड समिती रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी आयुष बडोनीकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकते. ऋषभ पंतच्या कर्णधारपदाच्या या निर्णयामागील एक प्रमुख कारण असे मानले जाते की तो सलग सामने खेळू शकणार नाही. ज्यामध्ये त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या संघात स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे. दिल्ली संघ सध्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये गट ड मध्ये १९ गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : “ऋषभने ‘त्या’ मित्रांपासून दूर राहावे”, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोहम्मद कैफने दिला महत्त्वाचा सल्ला

संघात कर्णधार म्हणून सामील होणे योग्य नाही –

दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने क्रिकबझला सांगितले की, पंतला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने ती नाकारली आणि कर्णधार म्हणून संघात परतणे शक्य होणार नाही असे सांगितले. कर्णधार म्हणून त्याच्या प्रवेशामुळे संघाचा समतोल बिघडू शकतो, असे पंतचे मत आहे. त्याने सध्याचा कर्णधार आणि संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंगवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. जर आपण पंतचा प्रथम श्रेणी क्रिकेट रेकॉर्ड पाहिला तर त्याने ६८ सामन्यांमध्ये ४६.३६ च्या सरासरीने ४८६८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ११ शतके आणि २४ अर्धशतके आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant revealed why he refused to lead delhi capitals in ranji trophy vbm