Rishabh Pant exercise Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरपासून दुखापतग्रस्त होता. पंत गेल्या वर्षी एका कार अपघाताचा बळी ठरला होता, ज्यामध्ये त्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र, त्याने त्याच्या सोशल मीडियावरील बायोमध्ये ऋषभ पंतच्या अपघाताची तारीख लिहून आपला दुसरा जन्म झाला असे म्हटले आहे. त्याचवेळी, पंतचा (ऋषभ पंत हेल्थ अपडेट) एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे.

माहितीसाठी की, स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत लवकरात लवकर टीम इंडियामध्ये परतण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे, इतकेच नाही तर त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळत असून तो जलद तंदुरुस्त होत आहे. यावेळी तो वेटलिफ्टिंग करताना दिसला. ऋषभ पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो झपाट्याने तंदुरुस्त होत असल्याने त्याचे चाहते खूप खुश आहेत.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

आयसीसीने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघांच्या खेळाडूंची नावे देण्यासाठी अंतिम तारीख निश्चित केली आहे. वर्ल्ड कप २०२३साठी, त्यांच्या खेळाडूंची यादी २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सबमिट केली जाऊ शकते. वास्तविक, २०२३च्या विश्वचषकासाठी संघांना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खेळाडूंच्या नावांची यादी आयसीसीकडे सोपवावी लागेल. मात्र, त्याआधी सर्व संघांना आयसीसीच्या तांत्रिक संघाची मान्यता घ्यावी लागणार आहे. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी सध्यातरी कोणतीही चांगली बातमी दिसत नाही.

ऋषभ पंत विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त नाही!

वास्तविक, बीसीसीआय नियोजित तारखेपर्यंत आयसीसीला जी यादी देईल त्यात ऋषभ पंतचे नाव असणे जवळपास अशक्य आहे. मात्र, आता बीसीसीआय आणि निवड समितीच्या नजरा के.एल. राहुलवर खिळल्या आहेत. मात्र, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की, के.एल. राहुल दुखापतीतून सावरला आहे. राहुल आशिया कपमधून पुनरागमन करेल असे मानले जात आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, ऋषभ पंत विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त राहणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: IND vs PAK: “…तर आम्ही टीम इंडियाला कुठेही हरवू शकतो”, माजी पाकिस्तानी खेळाडूने भारताला दिले आव्हान

बीसीसीआय आणि निवडकर्त्यांची चिंता काय?

के.एल. राहुल हा कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कायमस्वरूपी यष्टिरक्षक आहे. मात्र या यष्टीरक्षक फलंदाजाचा फिटनेस बीसीसीआय आणि निवड समितीसाठी अडचणीचा ठरला आहे. आता के.एल. राहुल जरी दुखापतीतून सावरला असला तरी निवडकर्त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही. आशिया चषकादरम्यान के.एल. राहुलच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यानंतर राहुल विश्वचषकासाठी कितपत फिट आहे हे ठरेल… सध्या के.एल. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. त्याचवेळी, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की राहुलने नेट सराव सुरू केला आहे.