Rishabh Pant Record IND vs NZ Test: भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवशी ८६ धावांवर ४ विकेट गमावल्यानंतर ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. दुसऱ्या दिवशी पंतने टी-२० शैलीत फलंदाजी करत ३६ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. तर गिलनेही त्याला साथ देत अर्धशतकी कामगिरी केली आणि भारतासाठी झटपट धावा केल्या. पंतने जबरदस्त कामगिरी करत ताबडतोड फलंदाजी केली आणि या ३६ चेंडूच्या वेगवान अर्धशतकासह अनेक विक्रम आपल्या नावे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुबमन गिलने ३०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपले ७वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. गिलने ६६ चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर पंतनेही त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्धशतक झळकावले. पंतने केवळ ३६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि अशा प्रकारे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासह पंतने यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडला. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत जैस्वालने ही मोठी कामगिरी केली होती. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जैस्वालने अवघ्या ४१ चेंडूत अर्धशतक झळकावले.

हेही वाचा – IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?

पंतने या अर्धशतकासह महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडला. धोनीला मागे टाकत कसोटी सामन्यांमध्ये १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह ५० अधिक धावा करणारा पंत हा दुसरा यष्टिरक्षक बनला आहे. पंतने आता कसोटी क्रिकेटमध्ये १०० अधिक स्ट्राइक रेटने पाच वेळा ५० अधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक वेळेस ही कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य

आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ऋषभ पंत ३८व्या षटकात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज ईश सोधीने त्याला पायचीत केले. पंतने ५९ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. पंतने गेल्या १८ कसोटी डावांमध्ये जवळपास १००० धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतकं केली आहेत.

कसोटीमध्ये 100+ स्ट्राइक रेटसह सर्वाधिक वेळेस ५० अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी.

१४ – वीरेंद्र सेहवाग
१३ – कपिल देव
५ – ऋषभ पंत*
४ – मोहम्मद अझरुद्दीन
४ – एमएस धोनी
४ – यशस्वी जैस्वाल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant sets new record after 36 ball fifty against new zealand broke yashasvi jaiswal record and becomes first indian batter ind vs nz bdg