Rishabh Pant shared a video of Rahul and Shreyas batting practice in NCA : यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने केएल राहुल आणि श्रेयस अय्यर याच्याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोन खेळाडूंचा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. यष्टीरक्षक फलंदाजाने केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

इंडियन एक्स्प्रेसने आधीच वृत्त दिले आहे की केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकासाठी टीम इंडियाच पुनरागमन करु शकले नाहीत, तर त्यांची विश्वचषकाच्या संघात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत आपला विश्वचषक संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. ३० ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होत असल्याने राहुल आणि अय्यरचा फिटनेस हा संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे इतर पर्याय वापरुन पाहावे लागत आहेत. दोन्ही खेळाडूंनी पुनरागमन केले, तरी संघ व्यवस्थापनासाठी तो त्यांची निवड एक जुगारच ठरेल.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण

राहुल आणि अय्यर पुन्हा लय शोधू शकतील का?

रिषभ पंत इन्स्टाग्राम व्हिडीओ

राहुल आणि अय्यर पुन्हा लय शोधू शकतील का? मधल्या फळीतील फलंदाजी आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी राहुल सांभाळू शकेल का? असे अनेक प्रश्न आहेत. जर राहुल आणि अय्यर आशिया कपला मुकले, तर भारतीय संघ परिस्थिती कशी हाताळतो, हे पाहणे मनोरंजक असेल. दोघांनीही तंदुरुस्ती मिळवून आशिया चषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवले, तर हे भारतीय संघ व्यवस्थापन मधल्या फळीबाबतच्या डोकेदुखीतून वाचेल.

हेही वाचा – IND vs WI : सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनसाठी आखली होती खास योजना, सामन्यानंतर रोमारियो शेफर्डने केला खुलासा

टीम इंडियासाठी मधल्या फळीची डोकेदुखी –

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे टीम इंडियाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संघाने बरेच प्रयोग केले. मधल्या फळीबद्दल प्रश्न आहेत. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, हार्दिक पांड्याही खराब फॉर्मशी झगडत आहे.

Story img Loader