कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केले. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर भारताने २-१ अशी मालिका विजयाने केली. या मालिकेत ऋषभ पंतने पूर्णपणे निराशा केली. त्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षण दोनही क्षेत्रांत फारसा प्रभाव पाडला नाही. पण सध्या तरीही तो एका खास कारणामुळे चर्चेत आहे.
IND vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी दोन बडे खेळाडू संघात
का आहे पंत चर्चेत?
मागील २ आठवडे भारतीय संघ सुटीवर आहे. त्यांचे कोणतेही क्रिकेट सामने नाहीत, त्यामुळे या कालावधीत भारतीय खेळाडू आपल्या जोडीदीरासोबत आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतदेखील यात अजिबात मागे नाही. त्याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तो चर्चेत आला आहे.
“माझ्यावर प्रशिक्षकाकडून बलात्काराचा प्रयत्न”; महिला क्रिकेटपटूची मदतीसाठी गौतम गंभीरकडे धाव
फोटोला दिलं झकास कॅप्शन
ऋषभने त्याची प्रेयसी इशा नेगी हिच्याबरोबर आपलं नववर्ष साजरं केलं आहे. त्याने नुकताच या सुट्ट्यांदरम्यानचा इशाबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. या फोटोमध्ये हे दोघे चहूबाजूंनी बर्फाने वेढलेल्या प्रदेशात दिसून येत आहेत. या फोटोला ऋषभने झकास कॅप्शन दिले आहे. ‘मी जेव्हा तुझ्याबरोबर असतो, तेव्हा मला मी अधिकच चांगला वाटू लागतो’, असे कॅप्शन देत त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता हार्दिकपाठोपाठ ऋषभ पंतचा नंबर लागतो की काय अशी चर्चा क्रीडावर्तुळात सुरू आहे.
मलिंगाने काहीही शिकवलं नाही! बुमराहचं धक्कादायक वक्तव्य
पंतची प्रेयसी इशा हिनेही फोटो शेअर केला आहे. त्यात ५ वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत आणि ते कायम एकत्र राहतील असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे आता ऋषभ पंतदेखील लवकरच एन्गेज होणार असं म्हटलं जात आहे.
‘कॅप्टन कूल’ धोनी पुन्हा कर्णधारपदी; बुमराह संघाबाहेर
वर्षाच्या शेवटच्या सामन्यात भारत विजयी
प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७४ धावा केल्या. विंडीजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. त्यानंतर विराटने ८५ धावांची खेळी केली. अखेर रविंद्र जाडेजा आणि मुंबईकर शार्दुल ठाकूर या दोघांनी योग्य वेळी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.