भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी २० मालिका जिंकून अप्रतिम कामगिरी केली आहे. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावणारा ऋषभ पंत हा विजयाचा शिल्पकार ठरला. पंतने नाबाद १२५ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असे असताना ऋषभ पंत वेगळ्याच तयारीमध्ये दिसत आहे. त्याने एका खुर्चीसह आपले दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्याने ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमधील प्रसिद्ध डायलॉगचा वापर कॅप्शन म्हणून केला आहे.

ऋषभ पंतने आपले दोन स्टायलिश फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने मिर्झापूरमधील ‘मुन्ना भैय्या’चा डायलॉग दिला आहे. पंतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “और हम एक नया नियम एड कर दे रहे हैं, मिर्जापुर की गद्दी पर बैठने वाला कभी भी नियम बदल सकता है- मुन्ना भैया”. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे मिर्झापूर वेबसिरीजमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका साकारणाऱ्या दिव्येंदू शर्माने पंतच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. “आप योग्य है”, अशी कमेंट दिव्येंदूने केली आहे. त्यावर ऋषभने पुन्हा उत्तर दिले आहे. ऋषभ म्हणाला, “नहीं मुन्ना भैय्या ये गद्दी आपकी ही है.” दोघांमधील हा कमेंट्सचा खेळ चाहत्यांना खूप आवडला आहे.

हेही वाचा – “विराट कोहली नक्कीच GOAT आहे”, भावूक बेन स्टोक्सने केले कौतुक

चाहते आणि दिव्येंदू शर्मा व्यतिरिक्त ऋषभ पंतची कथित गर्लफ्रेंड ईशा नेगीदेखील या फोटोंवर कमेंट केली आहे. ‘नोकिया ११००’, अशी कमेंट करून तिने ऋषभची खिल्ली उडवली आहे.

Story img Loader