Rishabh Pant Injury latest News Update : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा गतवर्षी भयानक अपघात झाला होता. कार अपघातामुळं ऋषफ पंतला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यापासून ऋषभ टीम इंडियातून बाहेर झाला आहे. ऋषभच्या दुखापतीवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तो सध्याच्या घडीला विश्रांती घेत आहे. परंतु, त्याला अजूनही व्यवस्थित चालता येत नाहीय. अशातच ऋषभचा एक फोटो समोर आला आहे. ऋषभ बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत रिहॅब प्रोग्रॅम सुरु करत असल्याचं या फोटोद्वारे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ऋषभ पंतने स्वत: हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने मंगळवारी इन्स्टास्टोरीमध्ये पायला दुखापत झाल्याचा फोटो शेअर केला. हा फोटो बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकडमीतील आहे. सर्व भारतीय खेळाडू या ठिकाणीच रिहॅब प्रोग्रॅमच्या माध्यमातून दुखापत आणि सर्जरीवर मात करून फिटनेस आणि फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करतात. जानेवारीत जेव्हा ऋषभची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हाही असंच म्हटलं जात होतं की, एप्रिलपर्यंत तो रिहॅब प्रोग्रॅम सुरु करेल. अशातच आता ऋषभच्या एनसीएमधील फोटोवरून असं वाटतंय की, त्याचा रिहॅब प्रोग्रॅम सुरु झाला आहे. ऋषभ पंत सामन्य तपासणीसाठी एनसीएमध्ये गेला असेल. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीय.
ऋषभ पंत वर्ल्डकप २०२३ ला मुकणार
यावर्षी ऋषभ पंतचं क्रिकेटमध्ये पुनरागमन होणं खूप कठीण आहे. अपघात झाल्यापासून चार महिने झाले आहेत. तरीही त्याला चालण्यासाठी स्टॅंडचा आधार घ्यावा लागत आहे. यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात ऋषभ पंत सहभाग नसणार आहे. त्यानंतर ऋषभ टीम इंडियात केव्हा पुनरागमन करेल, याबाबतही अधिकृत माहिती समोर आली नाहीय.