IND vs NZ 3rd Test Day 2 Updates in Marathi: ऋषभ पंत आणि शुबमन गिलने मंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच आतिषबाजी करत एक जबरदस्त सुरूवात करून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. दरम्यान भारताला जर सामन्यात टिकून राहायचे असेल तर दुसऱ्या दिवशी भारताला चांगली सुरूवात करणं अपेक्षित होतं. त्याचप्रकारे कामगिरी ऋषभ पंत आणि शुबमन गिलने केली. पंतने पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी केली आणि चौकारांचा पाऊस पाडला.

ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत विस्फोटक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलची तर पंतने अशी काही कुटाई केली की त्याच्या १५ चेंडूत पंतने ३३ धावा केल्या. परिणामी किवी कर्णधाराला गोलंदाज बदलावा लागला. पण तोवर भारताने चांगली फलंदाजी केली होती. पंतने ६ चौकार आणि २ षटकारांसह आपले वेगवान अर्धशतक पूर्ण केले. तर पंतच्या आधी गिलने ६९ चेंडूत आपले सातवे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.

PCB Chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025 Said Will Try to make the Visa Issuance Policy Brisk For Indian Fans
Champions Trophy: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यासाठी PCBची अनोखी योजना, भारतीय चाहत्यांसाठी आखली नवी कल्पना
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ Sunil Gavaskar Smashes Plate While Lunch After Seeing Washington Sundar New Ball Against New Zealand Ravi Shastri
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Shreyas Iyer not retained for IPL 2025 by KKR
Shreyas Iyer : ‘श्रेयस अय्यर KKR च्या रिटेन्शन लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता, पण…’, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचा मोठा खुलासा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य

भारताने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील पहिल्या तासात १४ षटकांत ७७ धावा केल्या आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे एकही विकेट भारताने गमावली नाही. भारताने पहिल्या दिवशीही चांगली सुरूवात केली पण दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९ चेंडूत ३ विकेट गमावले आणि संघ चांगलाच अडचणीत सापडला. पण ऋषभ पंत आणि शुबमन गिलने दुसऱ्या दिवशी चांगली सुरूवात करत संघाचा डाव उचलून धरला.

हेही वाचा – Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

न्यूझीलंड संघाकडे या कसोटीत स्पेशालिस्ट फिरकीपटू आहे तो म्हणजे एजाज पटेल. ग्लेन फिलीप्सदेखील एक चांगला गोलंदाज आहे. पण मिचेल सँटनरची अनुपस्थिती संघासाठी मोठा फटका बसला आहे. सँटनरच्या जागी ईश सोधीला संघाने संधी दिली. किवी खेळाडूंनी ऋषभ पंत आणि गिल दोघांच्याही कॅच ड्रॉप केल्या, ज्याचा त्यांना फटका बसला. ३६ षटकांत भारताने ४ बाद १७२ धावा केल्या आहेत. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे.

Story img Loader