Rishabh Pant Century After Comeback IND vs BAN 1st Test: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पुनरागमनानंतर भारत वि बांगलादेशमधील पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले आहे. ऋषभ पंतने रस्ते अपघातानंतर तब्बल ६३३ दिवसांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि पुनरागमनानंतर पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावत त्याने पुनरागमनाचा डंका वाजवला. पंतने १२४ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांसह आपले सहावे कसोटी शतक झळकावले. यासह पंतने धोनीच्या मैदानावरच त्याच्या शतकांची बरोबरी केली आहे.

धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

पंतने १२४ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक पूर्ण केले. अशा प्रकारे तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारा यष्टिरक्षक बनला. त्याने महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. धोनीने ९० कसोटी सामन्यांच्या १४४ डावांमध्ये ६ शतके झळकावली होती. यापूर्वी, पंतने २३ डिसेंबर २०२२ रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. पंतने ८८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले.

Whose Hand on Rishabh Pant Shoulder Indian Cricketer Solved Mystery Behind 6 Years Old Viral Photo of 2019 World Cup
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? ६ वर्ष जुन्या फोटोमागचं रहस्य अखेर उलगडलं, पंतने दिलं उत्तर
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…

हेही वाचा – VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड

आपले अर्धशतक पूर्ण करताच पंतने गियर बदलला आणि मैदानाच्या सर्व बाजूंनी मोठे फटके खेळायला सुरुवात केली. यानंतर त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारून आपली वैयक्तिक धावसंख्या ८० च्या पुढे नेली. लंचपर्यंत तो ८२ धावा करून खेळत होता. लंचनंतर लगेचच त्याने शतक पूर्ण करून नवा विक्रम रचला.

हेही वाचा – IND vs BAN : विराट कोहलीला रिव्ह्यू टाळणं पडलं महागात; रोहित व अंपायरची प्रतिक्रिया होतेय व्हायरल

भारतीय यष्टीरक्षकांकडून सर्वाधिक कसोटी शतके

६ – ऋषभ पंत*
६ – एमएस धोनी
३ – रिद्धिमान साहा

हेही वाचा: Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चारशे पार; कपिल देव, शमी, झहीर यांच्या मांदियाळीत पटकावले स्थान

Rishabh Pant Shubman Gill Partnership
शुबमन गिल-ऋषभ पंतची विक्रमी भागीदारी

गिल-पंतची विक्रमी भागीदारी

सातवेळा ९० धावांवर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने शतकी खेळी करताना १३ चौकार आणि चार षटकार मारले. यासह एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताने बांगलादेशविरूद्ध ४५० धावांचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकत्र फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली होती. या स्टेडियममधील दुसऱ्या डावातील भारतासाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. मोहिंदर अमरनाथ आणि मोहम्मद अझरुद्दीन (१९० वि. इंग्लंड) पहिल्या क्रमांकावर आहेत.

IND vs BAN: पंतने मोडला शिखर धवनचा मोठा विक्रम

पंतने शानदार शतकी खेळीदरम्यान पंतने एक मोठा पराक्रमही केला. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने शिखर धवनला मागे टाकले. शिखर धवनने ३४ कसोटी सामन्यांच्या ५८ डावात २३१५ धावा केल्या होत्या. आता चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून पंतने कसोटी धावांच्या बाबतीत धवनला मागे सोडले आहे. पंतने शिखर धवनच्या बरोबरीने सामन्यांच्या २४०० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात ६ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पंत हा ३२वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर धवनची ३३व्या स्थानावर घसरण झाली आहे.

Story img Loader