अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३१धावांनी मात करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने दिलेलं आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी भारताला चांगलचं झुंजवलं. मात्र भारतीय गोलंदाजांनी कांगारुंची झुंज मोडून काढत सामन्यात बाजी मारली. पॅट कमिन्स-मिचेल स्टार्क या जोडीने अखेरच्या फळीत छोटेखानी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या चांगलच नाकीनऊ आणलं. यावेळी भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने यष्टींमागून पॅट कमिन्सला स्लेजिंग करायला सुरुवात केली. त्याचं हे स्लेजिंग सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. इतकच नव्हे तर समालोचकांनीही पंतच्या या स्लेजिंगला दाद दिली.

दरम्यान या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने यष्टींमागे सर्वाधीक झेल टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. या सामन्यात पंतने यष्टीमागे ११ खेळाडूंचे झेल टिपले आहेत. अशी कामगिरी आतापर्यंत एकाही भारतीय यष्टीरक्षकाला करता आलेली नाही. यापूर्वी १० झेलसह साहा प्रथम क्रमांकावर होता. साहाने यष्टीरक्षक म्हणून याचवर्षी केपटाउन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच कसोटी सामन्यात १० झेल घेण्याची कामगिरी केली होती. तर ९ झेलसह धोनी दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, पंतने या कसोटी सामन्यात ११ झेल घेत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंतने धोनी-साहाला मागे टाकण्याबरोबरच डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. डिव्हिलियर्सने २०१३ मध्ये पाकिस्तान विरोधात एका कसोटी सामन्यात ११ झेल घेतले होते

Story img Loader