Rishabh Pant Surpasses MS Dhoni For Massive Feat in Test during IND vs NZ match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला आहे. मालिकेतील तिसरा सामना मुंबईत खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ २३५ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने सर्वबाद २६३ धावा करत २८ धावांची आघाडी घेतली. या दरम्यान ऋषभ पंतने ६० धावांची खेळी साकारत विशेष यादीत माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे.

ऋषभ पंतने धोनीला टाकले मागे –

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ५९ चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्याने १०१.६९ च्या स्ट्राईक रेटने ८ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीच्या जोरावर त्याने खास यादीत एमएस धोनीला मागे टाकले. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये १०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटसह सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाच १०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटसह सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि यशस्वी जैस्वाल यांना मागे टाकले आहे. या तीन फलंदाजांनी केवळ चार वेळा अशी कामगिरी केली आहे.

Shubman Gill Overtakes Cheteshwar Pujara
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs NZ India broke the embarrassing record of 50 years ago
IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Stuart Binny scoring 31 runs in last over against UAE video viral
Stuart Binny : स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या षटकात पाडला ३१ धावांचा पाऊस, तरीही यूएईविरुद्ध भारताला पत्करावा लागला पराभव, पाहा VIDEO
IND vs NZ Sunil Gavaskar Smashes Plate While Lunch After Seeing Washington Sundar New Ball Against New Zealand Ravi Shastri
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

भारतासाठी कसोटीत १०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटसह सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणारे फलंदाज :

  • १४ – वीरेंद्र सेहवाग
  • १३ – कपिल देव
  • ५ – ऋषभ पंत
  • ४ – मोहम्मद अझरुद्दीन
  • ४ – एमएस धोनी
  • ४ – यशस्वी जैस्वाल

हेही वाचा – Sai Sudarshan : साई सुदर्शनने IPL 2025 साठी रिटेन होताच केला मोठा धमाका! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले दमदार शतक

कसोटी क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे यष्टीरक्षक :

  • ८ – ॲडम गिलख्रिस्ट
  • ५ – ऋषभ पंत
  • ४ – एमएस धोनी
  • ४- जॉनी बेअरस्टो
  • ४ – सर्फराज अहमद
  • ३ – क्विंटन डी कॉक
  • ३ – एन डिकवेला
  • ३ – मॅट प्रायर

हेही वाचा – Shreyas Iyer : ‘श्रेयस अय्यर KKR च्या रिटेन्शन लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता, पण…’, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचा मोठा खुलासा

ऋषभ पंतने केवळ ३६ चेंडूत झळकावले अर्धशतक –

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावले. शुबमन गिलसह ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सांभाळला. पहिल्या दिवशी ८६ धावांवर ४ विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती, पण पंतने शानदार फलंदाजी करत डाव सांभाळला आणि गिलसोबत ९६ धावांची भागीदारी केली. या सामन्यात गिलने ९० धावा केल्या. तो त्याच्या शतकापासून फक्त १० धावांनी दूर राहिला.

Story img Loader