LSG Announces New Captain for IPL 2025: २१ मार्चपासून आयपीएल २०२५ ला सुरूवात होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू आपापल्या कर्णधारांची नावे जाहीर करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले होते. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स संघानेही आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. ऋषभ पंत संघाचा नवा कर्णधार असेल. आगामी हंगामात एलएसजी संघाचे नेतृत्व तो करताना दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनौ सुपर जायंट्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा

सोमवारी लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंत हा संघाचा नवा कर्णधार असेल, याची घोषणा केली आहे. लखनौचे मालक संजीव गोयंका म्हणाले, “ऋषभ पंत लखनौ संघाचा भविष्यातील कर्णधार ऋषभ पंत आहे. त्याला लिलावात संघाला सामील केलं तेव्हाच हा निर्णय घेण्यात आला होता. पण आम्ही एकत्र येऊन ही घोषणा करण्यासाठी थांबलो होतो.”

हेही वाचा – VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं?

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना लिलावात खरेदी केले. जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी बोली होती. ऋषभ पंतने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. लखनौ सुपर जायंट्स संघ आयपीएल २०२२ पासून खेळत आहे. २०२२, २०२३ आणि २०२४ लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलने केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली, संघ २०२२ आणि २०२३ मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला होता, परंतु २०२४ मध्ये संघाची कामगिरी घसरली. मेगा लिलावापूर्वी लखनौने केएल राहुललाही कायम ठेवले नाही. केएल राहुल पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

संघाचे मालक संजीव गोयंका यांना ऋषभ पंतलाच कर्णधार का केले विचारताच त्यांनी उत्तर दिले की, मला वाटतं, तो केवळ आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू नाही तर आयपीएलमधला सर्वोत्कृष्ट खेळाडूही आहे, हे काळ सिद्ध करेल. एलएसजीचा नवा कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पंत म्हणाला, “आश्चर्यकारक, सरांनी माझ्याबद्दल जे काही म्हटलं ते ऐकून मी भारावून गेलो आहे.”

हेही वाचा – Rohit Sharma Video: रोहित शर्माचा ब्रेकडान्स, श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी केली हटके डान्स स्टेप, वानखेडेच्या कार्यक्रमातील VIDEO व्हायरल

पंतला कर्णधार बनवून लखनौ सुपरजायंट्सने आपली जुनी परंपरा कायम ठेवली आहे. पंत हा तिसरा भारतीय यष्टीरक्षक आहे ज्याला संजीव गोयंका यांच्या फ्रँचायझीने कर्णधार बनवले आहे. पंतच्या आधी धोनीने पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले होते. यानंतर केएल राहुलला कर्णधारपद देण्यात आले.

आयपीएल २०२५ साठी लखनौ सुपर जायंट्सचा संघ

ऋषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, डेव्हिड मिलर, एडन माक्ररम, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, शमार जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग.