Rishabh Pant vs Jasprit Bumrah funny video viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी म्हणजेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. या सरावादरम्यान स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सरावाच्या वेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुनराहशी मस्ती करताना दिसला. विशेष म्हणजे त्याने जसप्रीत बुमराहसोबत १००-१०० डॉलर्सची पैज लावली. ज्यामध्ये पंतने स्वत: फलंदाजी करण्या बुमराहला गोलंदाजी केली, ज्याच व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पैजेमध्ये जेव्हा पंतने बुमराहची विकेट घेतली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पंतच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांची पैज नक्की कशासाठी लागली होती जाणून घेऊया. ऋषभ पंत नेटमध्ये जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ऋषभ पंत म्हणतो की, “मी तुला आउट करेन, १००-१०० डॉलर्सची पैज लागली. यावर बुमराह म्हणाला, “तू मला आऊट करु शकणार नाही, राहू दे.” त्याला प्रत्युत्तर देताना पंत म्हणतो, मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक विकेट घेतली आहे. यावर बुमराह म्हणतो, “अभिनंदन, तू ती सजवून ठेव, आता बस्स करं.”

यानंतर बुमराह फलंदाजी करताना पुल शॉट खेळतो, तेव्हा पंत त्याला बाद करतो. यानंतर पंत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलला आऊट आहे की नाही विचारतो. मात्र, मॉर्केल यावर काय निर्णय द्यायचा म्हणून गोंधळात पडतो. तितक्यात बुमराह म्हणतो, “बॉलिंग ॲक्शन बेकायदेशीर आहे. मी आऊट नाही. यावर पंत म्हणतो, “पण आपण तर नेटमध्ये आहोत.”

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा झाला पुन्हा बाबा; टीम इंडियानेच केलं शिक्कामोर्तब! तिलक-संजूसह सूर्याने दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

u

बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “असा सामना ज्याने गोलंदाजी प्रशिक्षकही गोंधळून गेले. तुम्ही टीम बुमराह आहात की टीम पंत? पंतने बुमराहला आऊट केले का?” ऋषभ पंतला बुमरासाठी गोलंदाजी करताना पाहून चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. ज्यापैकी एका चाहत्याने हसण्याचा इमोजीसह लिहिले, “टीम बुमराह की टीम पंत. हा वाद कधीच जुना होत नाही. कोणी मोठी खेळी केली?” दुसरा म्हणाला, “पंत आणि बुमराहच्या मस्तीला उत्तर नाही.” तिसरा म्हणाला, मी पंतसोबत आहे. अजून एक म्हणाला, “हा अल्टीमेट मुकाबला आहे. टीम बुमराह की टीम पंत? काय क्षण आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant vs jasprit bumrah rishabh puts 100 dollar bet on getting jasprit out pacer hits back with a savage reply vbm