यष्टीरक्षक ऋषभ पंतची यष्टींमागची खराब कामगिरी हा भारतीय संघातला गेल्या काही महिन्यांमधला चर्चेचा विषय बनलेला आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनी ऐवजी पंतला संधी दिली. मात्र ऋषभला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत खेळत असताना ऋषभच्या हेल्मेटला चेंडू लागल्यामुळे तो उपचार घेत आहे. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल भारतीय संघात यष्टीरक्षकाची भूमिका बजावली.

यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला विश्रांती देत लोकेश राहुललाच न्यूझीलंड दौऱ्यात संधी दिली. मात्र ऋषभ पंत भारतीय संघात लवकरच पुनरागमन करेल असा आत्मविश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने व्यक्त केला आहे. “ऋषभ तरुण आहे आणि त्याच्यात खूप गुणवत्ता आहे. आगामी आयपीएल हंगामादरम्यान मी त्याच्याशी बोलणार आहे. मला खात्री आहे तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेलं.” सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी बोलत असताना पाँटींगने आपलं मत व्यक्त केलं.

आयपीएलमध्ये ऋषभ खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा रिकी पाँटींग मूख्य प्रशिक्षक आहे. मध्यंतरीच्या काळात ऋषभच्या फलंदाजीत सुधारणा होण्यामागे पाँटींगचा मोठा वाटा आहे. २२ वर्षीय ऋषभ पंतने आतापर्यंत ११ कसोटी, १६ वन-डे आणि २८ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : जे पंतला जमलं नाही ते राहुलने करुन दाखवलं, केली धोनीशी बरोबरी

Story img Loader