Ishant Sharma Reaction on Rishabh Pant Injury: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच जखमी खेळाडूंचे वैद्यकीय अहवाल जाहीर केले. गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतने पुन्हा फलंदाजीचा सराव सुरू केल्याची माहिती बोर्डाने दिली होती. या बातमीने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्यांना वाटते की, पंत आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो, परंतु भारत आणि दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा त्याच्या पुनरागमनाबद्दल फारसा आशावादी नाही. त्याच्यामते तो आयपीएल २०२४मध्ये सुद्धा खेळू शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंत पूर्णपणे तंदुरुस्त असेल आणि केवळ विश्वचषकासाठीच नव्हे तर पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठीही उपलब्ध असेल, अशी इशांतला अपेक्षा नाही. मात्र, ऋषभच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने इशांतने दिलासा व्यक्त केला आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर खूप जखमा होत्या. अलीकडेच त्याने एन.सी.ए.मध्ये फलंदाजी आणि विकेटकीपिंग पुन्हा सुरू केल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत पण पंतची पुनरागमनाची तारीख अजून लांब आहे.

काय म्हणाला इशांत शर्मा?

“मला वाटतं आम्ही कदाचित पुढच्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतलाही खेळताना पाहू शकू. कारण, तो किरकोळ दुखापतग्रस्त झालेला नाही. हा एक अतिशय गंभीर अपघात होता. त्याने नुकतीच फलंदाजी आणि यष्टीरक्षणाला सुरुवात केली आहे. धावणे आणि टर्निंगसह अनेक गोष्टी आहेत, जे यष्टीरक्षक आणि फलंदाजासाठी सोपे नाही. त्यामुळे एवढ्या लवकर पंत आपल्याला मैदानात परताना दिसणार नाही.” असे इशांतने भारत आणि वेस्ट मधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये समालोचन करताना यावर भाष्य केले.

हेही वाचा: Rohit Sharma: “हे मुंबई की त्रिनिदाद?” दुसऱ्या कसोटीनंतर रोहित शर्माने हे ट्वीट का केले? कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल

दिग्गज गोलंदाज इशांत पुढे म्हणाला, “एक चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली नाही. जर त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली असती तर तो बराच काळ आणखी बाहेर राहिला असता. त्याच्यावर आता एक शस्त्रक्रिया झाली आहे पण मला वाटत नाही की, तो विश्वचषकासाठी निश्चितपणे तंदुरुस्त होईल. आशा आहे की तो आयपीएलसाठी तंदुरुस्त असेल. जर असे झाले तर ते खूप चांगले होईल, मी एक त्याचा मित्र म्हणून नक्कीच स्वागत करेन. मात्र, एवढ्या लवकर त्याचे पुनरागमन होणे अवघड आहे.”

पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले

डेव्हिड वॉर्नरने ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत आयपीएल २०२३ हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले. फ्रँचायझीची कामगिरी निराशाजनक झाली आहे. गुणतालिकेत संघ नवव्या स्थानावर आहे. यष्टिरक्षक फलंदाजाशिवाय दुसरा हंगाम फ्रँचायझीसाठी अधिक त्रासदायक ठरू शकतो.

हेही वाचा: Rohit Sharma: हिटमॅन झाला किंग कोहलीचा चाहता; सामन्यानंतर म्हणाला, “विराटसारखा खेळाडू डाव सावरण्यासाठी…”

पंतबद्दल बीसीसीआय काय म्हणाले?

ऋषभ पंतबाबत बीसीसीआयने सांगितले होते की, “रिहॅबीलिटेशन मध्ये त्याच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. पंतने नेटमध्ये फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणाला सुरुवात केली आहे. तो सध्या त्याच्यासाठी तयार केलेल्या फिटनेस शेड्यूलचे पालन करत आहे ज्यामध्ये ताकद, लवचिकता आणि धावणे या गोष्टींचा समावेश आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant will not play ipl next year also delhi capitals veteran fast bowlers big statement explained the reason avw