हॉकी क्षेत्रातील दिग्गजांची खंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रितू राणीने भारतीय महिला हॉकी संघाला ३६ वर्षांनंतर ऑलिम्पिक प्रवेश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. मात्र हॉकी इंडियातील अंतर्गत बंडाळ्यांचा ती बळी ठरली आणि ऑलिम्पिक स्पध्रेपूर्वी तिला संघाबाहेर बसविण्यात आले. हॉकी इंडियाच्या या निर्णयावर तिने जाहीर नाराजीही व्यक्त केली, परंतु तिला संघटनेकडून दाद न मिळाल्याने वयाच्या २४व्या वर्षीच तिला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला. ऐन उमेदीच्या काळात तिने घेतलेला निर्णय भारतीय हॉकी क्षेत्राला चटका लावणारा आहे. त्यामुळेच रितूने निवृत्तीची घाई केली, असा सूर हॉकी क्षेत्रात उमटत आहे.

‘‘विजयी कर्णधार बदलण्याची चूक हॉकी इंडियाने केली. रितूला अशा पद्धतीने संघाबाहेर ठेवणे दुर्दैवी होते, पण तिनेही निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विचार करायला हवा होता. तिने आपल्या कामगिरीने संघटनेला प्रत्युत्तर द्यायला हवे होते. संघाबाहेर राहून ती काहीच करू शकणार नाही,’’ असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक क्लॅरेन्स लोबो यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘‘तिचे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले. एक सर्वोत्तम खेळाडूला आपण मुकलो. आता अन्यायाविरोधात कुणीही खेळाडू पुढे येणार नाही.’’

रितूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१४च्या आशियाई स्पध्रेत कांस्यपदक जिंकले होते. तसेच २०१४-१५च्या महिला एफआयएच हॉकी विश्व लीग उपांत्य फेरी स्पध्रेत पाचवे स्थान पटकावून ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केली होती. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक प्रवेश मिळवण्याचा पराक्रम केला होता. भारतीय पुरुष हॉकी

संघाचे माजी खेळाडू व प्रशिक्षक जोआकीम काव्‍‌र्हालो यांनी रितूची बाजू मांडून हॉकी इंडियावर लक्ष्य साधताना म्हटले की, ‘‘रितू हॉकी इंडियाच्या राजकारणाची बळी ठरली. तिच्यावर अन्याय झाला. तिच्यावर गैरवर्तणुकीचा ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते का? हे तपासायला हवे. हॉकी इंडियाने तिला निवृत्ती घेण्यास भाग पाडले. याचा इतर खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम होईल आणि हे भारतीय हॉकीसाठी घातक आहे.’’

माजी खेळाडू धनंजय महाडिकने रितू राणीने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, असे मत व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘रितूने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा आणि दमदार पुनरागमन करावे. हॉकी इंडिया खेळाडूला संघातून वगळण्याचा निर्णय घेत नाही. तो प्रशिक्षकाचा असतो.’’

माजी खेळाडू सेल्मा डी’सिल्व्हा आणि एलिझा नेल्सन यांनीही रितू राणीला संघातून वगळण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.