दक्षिण कोरियात होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व मधल्या फळीतील खेळाडू रितू राणी हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू बी. पी. गोविंदा, हरिबदर सिंग, सुरिंदर कौर, उच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्ट्समन व संघाचे मुख्य प्रशिक्षक नील हॉवगुड यांनी या संघाची निवड केली. आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाला २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या लढतीत थायलंडशी खेळावे लागणार आहे. त्यानंतर भारताची चीन (२४ सप्टेंबर), मलेशिया (२६ सप्टेंबर) यांच्याशी गाठ पडणार आहे. भारतीय संघ १३ सप्टेंबर रोजी कोरियाला रवाना होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघ : गोलरक्षक : सविताकुमारी. बचावरक्षक : दीपग्रेस एक्का, दीपिका कुमारी (उपकर्णधार), सुनीता लाकरा, नमिता टोप्पो, जसप्रित कौर, सुशीला चानू, मोनिका कुमारी. मध्यरक्षक : रितू राणी (कर्णधार), लिलिमा मिंझ, अमनदीप कौर, चंचनदेवी ठोकचोम. आघाडी फळी : राणी रामपाल, पूनम राणी, वंदना कटारिया, नवज्योत कौर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा