IPL 2021 च्या यंदाच्या मोसमात सुरुवातीपासून काही सुमार क्षेत्ररक्षणाची उदाहरणं पाहायला मिळाली. अनेकदा सामान्य झेल देखील सुटल्याचं पाहायला मिळालं, तर खराब क्षेत्ररक्षणामुळे अतिरिक्त धावा देखील गेल्याचं दिसून आलं. पण आयपीएलच्या सातव्या दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यामध्ये राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी काही अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे नमुनेच सादर केले. यामध्ये खुद्द कर्णधार संजू सॅमसननं शिखर धवनचा यष्ट्यांच्या मागे घेतलेला अप्रतिम झेल चर्चेत राहिला. पण त्याहून जास्त चर्चा झाली ती रियान परागनं दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला धावचीत केल्यानंतर केलेल्या बिहू नृत्याची! आनंदाच्या क्षणी रियान परागला बिहू हे पारंपरित नृत्य करताना अनेकदा पाहिलं गेलं आहे. पण यावेळी चक्क दिल्लीच्या कर्णधाराचीच महत्त्वाची विकेट घेतल्यानंतर त्याच्या बिहू नृत्याचा आनंद काही औरच होता!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा