Riyan Parag Prediction: यंदा आयपीएलचा १६ वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आयपीएलची तयारी करण्यासाठी सर्व संघ शिबिरे लावत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान पराग याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. पराग सराव करत आहे. त्याचा देशांतर्गत हंगाम चांगला गेला आहे. अशा परिस्थितीत त्याचा आत्मविश्वास खूपच उंचावला आहे. रियान परागने ट्विट करून घोषणा केली आहे की, यावेळी तो आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणार आहे.
रियान परागने ट्विट केले आहे की, ‘माझा अंतरात्मा म्हणतो की, या आयपीएलमध्ये मी एका ओव्हरमध्ये ४ षटकार मारतोय.’ पराग आयपीएलमध्ये बराच काळ राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.
या देशांतर्गत मोसमात रियान परागच्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली आहे. परागने गुवाहाटी प्रीमियर लीगच्या १२ सामन्यात ६८३ धावा केल्या आहेत. तसेच २७ बळी घेतले. या स्पर्धेतील तो मालिकावीरही ठरला. हा फॉर्म आयपीएलमध्येही कायम ठेवण्याचा तो प्रयत्न करेल.
या स्पर्धेत प्लेअर ऑफ द फायनल मॅच, प्लेअर ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, सर्वाधिक विकेट्स असे सर्व पुरस्कार जिंकून रियान परागने पटकावले. त्याने दाखवून दिले की तो आयपीएल २०२३ साठी तयारी करत आहे. राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२३ मध्ये पहिला सामना २ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे.
राजस्थान रॉयल्सचे पथक:
संजू सॅमसन (कर्णधार), कुणाल सिंग राठौर, डोनोवन फरेरा, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिककल, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, कुणाल सिंग राठोर, ध्रुव जुरेल, जो रूट, जेसन होल्डर, रियान पराग, आर अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल बाशिथ. ओबेद मॅकॉय, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, कुलदीप यादव, ट्रेंट बोल्ट, अॅडम झाम्पा, केएम आसिफ, मुरुगन अश्विन.