Hardik Pandya Ambani Wedding Video : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या टी-२० विश्वचषक २०२४ नंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये पूर्णपणे मग्न दिसला. या लग्नाला क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत सर्वत्र स्टार्सनी हजेरी लावली होती.यादरम्यान हार्दिक पंड्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डान्स करताना दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हार्दिक पंड्या अनंत अंबानीच्या लग्नात भाऊ कृणाल पंड्या आणि वहिनी पंखुरी शर्मासह पोहोचला होता. मागील फंक्शनप्रमाणेच यावेळीही चाहते नताशाला शोधताना दिसले. व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्या अभिनेत्री अनन्यासोबत डान्स करताना दिसत आहे. हे दोघेही शाहरुख खानच्या ‘गोरी गोरी’ गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसले. जे पाहिल्यानंतर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
एका यूजरने लिहिले, ‘काय चालले आहे?’ तर एका चाहत्याने लिहिले की, ‘लोक नताशाला शोधत आहेत, आमचा हार्दिक भाई लवकरच काहीतरी करणार आहे.’ इतकेच नाही तर हा डान्स पाहून अनेक चाहत्यांना युवा क्रिकेटर रियान परागची आठवण झाली. तो म्हणाला, ‘असं काय आहे त्याच्यामध्ये’, या लग्नाला अनेक क्रिकेटर्सनीही हजेरी लावली होती. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती.
हेही वाचा – WLC 2024 : ५ षटकार… ४ चौकार, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला करुन दिली जुन्या दहशतीची आठवण
रियान परागच्या यूट्यूब हिस्ट्रीमध्ये दिसली होती अनन्या पांडे –
रियान परागची आठवण येण्याचे कारण म्हणजे त्याची यूट्यूब हिस्ट्री आहे. रियानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये रियान परागची यूट्यूब हिस्ट्री चाहत्यांना दिसली होती. यामध्ये अनन्या पांडेसह काही अभिनेत्रींची नावे हिस्ट्रीत दिसली. या व्हिडिओवरून बराच गदारोळ झाला होता. आता हार्दिक-अनन्याचा डान्स पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, ‘रियान परागला राग येईल.’
हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण –
हार्दिक पंड्याचे अंबानी कुटुंबाशी खूप जुने नाते आहे. तो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असून या संघाची मालकी अंबानी कुटुंबीय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे. अंबानी कुटुंबाच्या वतीने नीता अंबानी आणि आकाश अंबानी या संघाचे व्यवस्थापन करतात. आता अंबानी कुटुंबातील लग्नासाठी हार्दिक पंड्याला पत्नी नताशा शिवाय आल्याने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. हार्दिक आणि नताशा अनेक महिन्यांपासून एकत्र दिसत नाहीत.