Road safety world series 2022 : एकीकडे यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धा सुरू असताना आता दुसरीकडे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेतील पहिली लढत ही इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यात कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान या सामन्यात तब्बल ११ वर्षांनी क्रिकेट जगातील तीन दिग्गज खेळाडू सोबत खेळताना दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>> ‘सध्याच्या खेळाडूंपेक्षा तू अधिक सरस,’ मारिया शारापोवाने टेनिसपटू सेरेना विल्यम्सला दिला होता विवृत्ती न घेण्याचा सल्ला

इंडिया लिजेंड्स संघाचे कर्णधारपद सचित तेंडुलकर भुषवणार आहे. याच संघामध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि सुरेश रैना झळकणार आहेत. या तिन्ही खेळाडूंनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवलेली असून ते आता पुन्हा एकदा तब्बल ११ वर्षांनी सोबत दिसणार आहेत. या सामन्यात तेंडुलकर, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्याकडून चौकार आणि षटकार यांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा >>>> PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानने सामना गमावला, पण खेळाडूंच्या करामतीची होतेय चर्चा; झेल टिपल्यानंतर मैदानातच…

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज येत्या १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधित खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतील. सचिनने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामातही सहभाग नोंदवला होता. सचिनसोबत नमन ओझा, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा तसेच युवराज सिंगसह इतर खेळाडूदेखील दिसतील. बाद फेरीचे सामने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधित होतील.

हेही वाचा >>>> Anushka Sharma : विराटने शतक झळकावताच पत्नी अनुष्काची खास पोस्ट, पतीला उद्देशून म्हणाली “कोणत्याही…”

या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात एकूण सात संघांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी न्यूझीलंड लिजेंड्स या आणखी एका संघाचा समावेश झाला आहे. म्हणजेच या हंगामात इंडिया लिजेंड्स, ऑस्ट्रेलिया लिजेंड्स, श्रीलंका लिजेंड्स, वेस्ट इंडिज लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, बांगलादेश लिजेंड्स, इंग्लंड लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स असे एकूण आठ संघ सहभागी होतील.