IPL Auction 2024, Robin Minz: दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटू करोडपती होतात. यातील अनेक खेळाडू देशासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळतात आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देतात. जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पंड्या आणि शुबमन गिलपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये करोडपती झाल्यानंतर देशासाठी चांगली कामगिरी करत आहेत. सध्या हे खेळाडू टीम इंडियाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
२०२४ च्या या मिनी आयपीएल लिलावातही अनेक युवा खेळाडू करोडपती झाले आहेत. समीर रिझवीपासून शुभम दुबे आणि कुमार कुशाग्रापर्यंत अनेक खेळाडू यावेळी महागात विकले गेले. या यादीत झारखंडच्या रॉबिन मिन्झचेही नाव आहे. त्याला गुजरात संघाने ३.६ कोटी रुपयांना विकत घेतले, तेव्हापासून तो सतत चर्चेत राहिला.
रॉबिन मिन्झचे वडील रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक आहेत आणि लिलावापूर्वी धोनीने त्याला वचन दिले होते की जर कोणत्याही संघाने त्याच्यावर सट्टा लावला नाही तर चेन्नई सुपर किंग्ज संघ त्याला खरेदी करेल. तथापि, अनेक संघांनी रॉबिनला विकत घेण्यासाठी स्पर्धा केली. चेन्नईशिवाय हैदराबादनेही त्याच्यावर बोली लावली. अखेर गुजरातने त्यांचा संघात समावेश केला.
रॉबिन मिन्झ हा अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे आणि लहानपणी तो सरपण पासून बॅट बनवून क्रिकेट खेळत असे. एवढी आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना देखील त्याच्या कुटुंबाने त्याला खेळण्यापासून कधीही रोखले नाही. याच कारणामुळे कठीण आव्हानांवर मात करत तो इथपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या प्रशिक्षकानेही त्याला नेहमीच साथ दिली आणि हा होतकरू खेळाडू सर्व अडचणींवर मात करून आयपीएलमध्ये खेळणारा पहिला आदिवासी मुलगा तयार आहे. या लीगमध्ये सामील होणारा तो पहिला आदिवासी भागातील खेळाडू ठरला आहे.
रॉबिनने त्याच्यावरील बोलीनंतर मनोगत व्यक्त केले आहे. तो म्हणतो की, “मी माझ्या आयुष्यात अजून काहीही साध्य केलेले नाही. मला अजूनही खूप काही करायचे आहे.” तो पुढे म्हणाला की, “मला आता आयपीएलच्या माध्यमातून देशासाठी खेळायचे आहे आणि टीम इंडियाला विश्वचषकही जिंकवून द्यायचा आहे.” रॉबिन हा पुढचा धोनी मानला जात आहे. मोठे फटके खेळण्यात तो माहीर आहे. त्याचा स्वभाव शांत आहे आणि तो शिकण्यास उत्सुक आहे. असे खेळाडू जागतिक स्तरावर चमत्कार करतात.
इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव झाला. हा एक छोटा लिलाव होता आणि बहुतेक संघांकडे त्यांचे प्रमुख खेळाडू आधीच होते. अशा परिस्थितीत भारताचे मोठे खेळाडू या लिलावाचा भाग नव्हते. यामुळे परदेशी खेळाडूंचा संपूर्ण लिलावात बोलबाला होता. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आकर्षणाचे केंद्र होते. सर्वप्रथम, लिलावात २० कोटींचा टप्पा पार करणारा पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. सनरायझर्स हैदराबादने त्याला २०.५० कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.