Gujarat Titans’ Robin Minz gets involved in road accident : आयपीएल २०२४ पूर्वी गुजरात टायटन्ससाठी वाईट बातमी आली आहे. खरंतर, संघाचा स्टार खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात झाला आहे. या अघातात तो जखमी झाला आहे. आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात गुजरातने रॉबिनला ३.६ कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी झुंज दिल्यानंतर त्याला गुजरातने विकत घेतले होते. रॉबिन आयपीएलमध्ये विकला जाणारा पहिला आदिवासी खेळाडू ठरला होता.

ही घटना तो सुपरबाईक चालवत असताना झारखंडमध्ये घडली. रिपोर्टनुसार, त्याची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली. दरम्यान, मिंन्झचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मिन्झचे वडील फ्रान्सिस मिन्झ यांनी आपल्या मुलाच्या दुखापतीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, रॉबिनला किरकोळ दुखापत झाली असून तो निरीक्षणाखाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Accident
Accident : बाईकवर स्टंट करणाऱ्याला वाचवताना घात झाला, कारची ५ वेळा पलटी; कुंभमेळ्यावरून परतणारे ५ नेपाळी भाविक ठार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
Pimpri Municipal Corporation, Cycle Track ,
पिंपरी : महापालिकेचा सायकल ट्रॅक की अडथळ्यांची शर्यत?
well equipped gang stole 500 liters of diesel on Samriddhi Highway
समृद्धी महामार्गावर ५०० लिटर डिझेलची चोरी, टोळ्यांकडून चारचाकी वाहनांचा वापर…
74 year old man died after being crushed by Thane Municipal Corporations hourglass in Santosh Nagar
महापालिकेच्या घंटागाडीने वृद्धाला फरफटत नेले, अपघातात वृद्धाचा मृत्यू
Three injured as speeding car hit 5 vehicles
मोटारीची पाच वाहनांना धडक; सांगलीजवळ तिघे जखमी
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ

सुपरबाईकमुळे झाला अपघात –

सुपरबाईकमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या वडिलांनी ‘न्यूज १८’ शी बोलताना सांगितले की, “त्याची बाईक दुसऱ्या बाईकच्या संपर्कात आल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले. सध्या काहीही गंभीर नाही आणि तो सध्या निरीक्षणाखाली आहे.” रॉबिनच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी रॉबिनला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यर अपयशी, संदीप वारियरचा ठरला बळी

गुजरात टायचन्सच्या अडचणी वाढल्या –

आयपीएल २०२४ पूर्वी नवीन खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात गुजरातसाठी मोठी समस्या ठरू शकतो. रॉबिनला विकत घेण्यासाठी संघाने मोठी रक्कम खर्च केली होती. आता आयपीएल सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आता या अपघातानंतर रॉबिन पहिला हंगाम खेळतो की नाही हे पाहायचे आहे. मिन्झ हा ‘बिग हिटर’ म्हणून ओळखला जातो. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती आणि तो ३.६ कोटी रुपयांना विकला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २१ वर्षीय मिन्झ सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मिन्झ हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. काही दिवसापूर्वीच गुजरातचा नवा कर्णधार असलेल्या शुबमन गिलने मिन्झच्या वडिलांची भेट घेतली होती.

हेही वाचा – धनश्री वर्माचा ‘तो’ फोटो व्हायरल, वेगवेगळ्या चर्चांना उधाण; युजवेंद्र चहलही होतोय ट्रोल!

मिन्झच्या उजव्या गुडघ्याला दुखापत –

रिपोर्टनुसार, मिन्झच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. हार्दिक आणि शमीच्या जाण्याने नुकसान सोसत असलेल्या गुजरात संघाला आणखी एक वाईट बातमी मिळाली आहे. रॉबिन कधी तंदुरुस्त होईल याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. रॉबिन मिन्झने झारखंडसाठी अद्याप एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही, तरीही तो खूप मोठी रक्कम मिळवण्यात यशस्वी झाला. शुबमन रॉबिनचा खेळ पाहण्यासाठी उत्साहित असल्याचे सांगितले होते.

Story img Loader