Robin Uthappa Takes Dig at CSK For Helping Rachin Ravindra Before test: न्यूझीलंडने भारताला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीवर मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. जे काम आजपर्यंत एकही विदेशी भारतात करू शकला नाही ते किवींनी केले. भारतीय दिग्गजांनी या पराभवाची वेगवेगळी कारणे दिली. मात्र, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन उथप्पाने भारताचा पराभवाचा एक धागादोरा चेन्नई सुपर किंग्जशी जोडला. यासह फ्रँचायझीला देशहितासाठी काम करण्याचा सल्लाही त्याने दिला.

भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा २०२१ आणि २०२२च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. मात्र, भारताच्या लाजिरवाण्या पराभवात या फ्रँचायझीचाही वाटा असल्याचे त्याचे मत आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याने सांगितले की, किवी संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्जकडून खूप मदत मिळाली.

Ruturaj Gaikwad Speaks About Controversial Decision of Ankit Bawne Catch Out in the Ranji Trophy Game Between Services and Maharashtra
Ruturaj Gaikwad: “अपील करायला लाज वाटली पाहिजे…”, ऑस्ट्रेलियातून महाराष्ट्रासाठी धावून आला ऋतुराज गायकवाड, रणजीमधील कॅचचा व्हीडिओ केला शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Statement About Rohit Sharma Misses 1st Test Said If Your wife is going to have a baby IND vs AUS
Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर
India vs South Africa T20I Series 2024 Live Streaming Full Schedule Fixtures Squads Time Table telecast other details
IND vs SA: भारत-आफ्रिका टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? पहिल्या-दुसऱ्या सामन्याच्या वेळा वेगवेगळ्या, वाचा सविस्तर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Shreyas Iyer Double Century After 9 year for Mumbai Scores Career Best First Class 233 Runs Innings Mumbai vs Odisha
Shreyas Iyer Double Century: २४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा… श्रेयस अय्यरने वादळी खेळीसह मोडला स्वत:चाच मोठा विक्रम, IPL लिलावापूर्वी टी-२० अंदाजात केली फटकेबाजी
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर

उथप्पा म्हणाला, ‘रचिन रवींद्रने भारतात येऊन चेन्नई सुपर किंग्जच्या अकादमीमध्ये सराव केला. CSK ही एक उत्तम फ्रँचायझी आहे जी नेहमी आपल्या खेळाडूंचा विचार करते पण एक अशी सीमा असावी की जिथे देश प्रथम आणि नंतर फ्रँचायझीचे खेळाडू येतील मुख्य म्हणजे जेव्हा एक विदेशी खेळाडू भारतात येऊन भारताविरूद्ध खेळणार आहे.

पुढे उथप्पा म्हणाला, चेन्नईने आपल्या खेळाडूचा विचार केला याचं मला आश्चर्य वाटत नाहीय. कदाचित मी बरोबर बोलतही नसेन, मला चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी प्रचंड आवडते. पण देशाचा मुद्दा असेल तर ती सीमारेषा ओलांडली नाही पाहिजे. म्हणून रचिन रवींद्रने या मालिकेत 51.20 च्या सरासरीने 256 धावा केल्या. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली.

हेही वाचा – Video: अल्झारी जोसेफ कर्णधारावरच भडकला, रागाच्या भरात थेट गेला मैदानाबाहेर, १० खेळाडूंसह खेळण्याची वेस्ट इंडिजवर ओढवली वेळ

रचिन रवींद्रच्या शतकी खेळीबाबत बोलताना उथप्पा म्हणाला, ‘चेन्नईत केलेल्या तयारीच्या जोरावर रचिनने सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याची ही खेळी भारतीय भूमीवर खेळलेल्या विदेशी खेळाडूंपैी सर्वात नेत्रदीपक खेळी होती. चिन्नास्वामीच्या त्या खेळपट्टीवर १५७ चेंडूत १३४ धावा करताना दमदार फलंदाजी केली. तो न्यूझीलंड क्रिकेटचे भविष्य असल्याचे त्याने दाखवून दिले.

हेही वाचा – Shreyas Iyer Double Century: २४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा… श्रेयस अय्यरने वादळी खेळीसह मोडला स्वत:चाच मोठा विक्रम, IPL लिलावापूर्वी टी-२० अंदाजात केली फटकेबाजी

Robin Uthappa Video Grab
रॉबिन उथप्पा सीएसकेवर भडकला (फोटो-रॉबिन उथप्पा युट्युब व्हीडिओ)

रचिन रवींद्रने ग्रेटर नोएडामधील अफगाणिस्तान विरुद्धच्या त्यांच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्सच्या अकादमीमध्ये गेला होता आणि तिथे त्याने भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सरावही केला. रचिनने पहिल्या कसोटीत १३४ धावांची शानदार खेळी खेळली आणि त्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद ३९* धावा करून न्यूझीलंडला मिळालेल्या १०७ धावांच्या लक्ष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

Story img Loader