टेनिसचा सम्राट रॉजर फेडरर भारतात होऊ घातलेल्या इंटरनॅशनल प्रिमिअर टेनिस लीग(आयपीटीएल) स्पर्धेसाठी डिसेंबर महिन्यात भारतात येत आहे. या पार्श्वभूमीवर रॉजर फेडररला भारताविषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. भारतात आल्यास कोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी, याबद्दल फेडरर सध्या एका अनोख्या पद्धतीने चाहत्यांकडून अभिप्राय मागविले आहेत. चाहत्यांनी फोटोशॉप या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपण कोणत्या ठिकाणाला भेट द्यावी, याबद्दल सांगण्याचे आवाहन फेडररने ट्विटरवरून केले आहे. या आवाहनला प्रतिसाद देताना भारतीय टेनिस चाहत्यांनीही भन्नाट शक्कली लढविल्या आहेत.   
  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

 

 

 

 

 

 

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger federer asks fans to photoshop him around india the result is hilarious