रॉजर फेडरर आणि स्टॅनिसलॉस वॉवरिन्का..दोघांचा देश एकच-स्वित्र्झलड, दोघे घट्ट मित्र, मात्र या दोन जिवलग मित्रांमध्येच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगला आणि झंझावाती वॉवरिन्काने बलाढय़ फेडररला सरळ सेट्समध्ये नमवत स्पर्धेतील सगळ्यात खळबळजनक विजयाची नोंद केली. आठव्या मानांकित वॉवरिन्काने द्वितीय मानांकित फेडररवर ६-४, ६-३, ७-६ असा विजय मिळवला आणि फेडररवर ‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत गाशा गुंडाळण्याची वेळ ओढवली.
विक्रमी १८व्या ग्रँडस्लॅमसाठी ३४व्या वर्षी प्रयत्नशील फेडररला या सामन्यात एकदाही वॉवरिन्काची सव्‍‌र्हिस भेदता आली नाही. १३ वर्ष आणि २९१ सामन्यांनंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या सामन्यात फेडररवर ही नामुष्की ओढवली. वॉवरिन्काविरुद्धच्या लढतीत फेडररची कामगिरी १८-२ अशी होती. मात्र मंगळवारी भेदक सव्‍‌र्हिस, वैविध्यपूर्ण फटके आणि सर्वागीण खेळाच्या जोरावर वॉवरिन्काने फेडररला निष्प्रभ केले. दुसरीकडे दिमाखदार विजयासह वॉवरिन्काने कारकीर्दीत पहिल्यांदाच फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले. पहिल्या सेटच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या सेटच्या सातव्या गेममध्ये वॉवरिन्काने फेडररची सव्‍‌र्हिस भेदली. तिसऱ्या सेटमध्ये
महिलांमध्ये अ‍ॅना इव्हानोव्हिक आणि ल्युसी साफारोव्हा यांनी उपांत्य फेरीत स्थान पटकावले. अ‍ॅनाने एलिना स्वितोलिनावर ६-३, ६-२ असा सहज विजय मिळवत सात वर्षांनंतर ग्रॅडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत ल्युसी साफारोव्हाने गार्बिन म्युगुरूझावर ७-६, ६-३ अशी मात केली. शारापोव्हाविरुद्धचा फॉर्म कायम राखत साफारोव्हाने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढतीत साफारोव्हासमोर अ‍ॅनाचेच आव्हान असणार आहे.

सज्जा कोसळला
समालोचन कक्षानजीकच्या मोठय़ा व्हिडिओ स्क्रीनचा भाग जोरदार वाऱ्यामुळे जागेवरून निखळून प्रेक्षक बसलेल्या ठिकाणी कोसळल्याची दुर्घटना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यान घडली. या दुर्घटनेत एक प्रेक्षक जखमी झाला. जो विलफ्रेड सोंगा आणि केई निशिकोरी यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेमुळे पंधरा मिनिटांसाठी खेळ थांबवण्यात आला. स्क्रीन कोसळलेल्या ठिकाणच्या दोन रांगा रिकाम्या करून सामना सुरू करण्यात आला.

Story img Loader