स्विस मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेनिसपटू रॉजर फेडररला स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमण्यात आले आहे. वर्षानुवर्षे स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडररने स्विस राष्ट्रीय पर्यटन मंडळाबरोबर दीर्घकालीन करार केला आहे. याचा उद्देश स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आहे.
Very excited to team up with @MySwitzerland_e and officially present my home country https://t.co/m4Re9NmSfx #IneedSwitzerland #paidpartnership pic.twitter.com/7rwICmyc2D
— Roger Federer (@rogerfederer) March 29, 2021
फेडरर आणि स्वित्झर्लंड जागतिक स्तरावर देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्र काम करतील. कोरोनाचा संपूर्ण जगात पर्यटन क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. “पर्यटनाला चालना देण्यासाठी फेडरर ही योग्य व्यक्ती आहे”, असे स्वित्झर्लंडच्या पर्यटन मुख्य कार्यकारी अधिकारी माऊट निडेगर यांनी सांगितले.
फेडरर म्हणाला, “मी टेनिस कोर्टवर पाऊल ठेवताना स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच विचार केला. माझे नाव जिथेही जाईल तेथे स्वित्झर्लंडचा ध्वज असावा, असे मला वाटते. गेल्या 22 वर्षांपासून ही कामगिरी करण्याचा मला अभिमान आहे. स्वित्झर्लंड टूरिझमशी जोडणे तार्किक आहे पाऊल आहे.”