रॉजर फेडरर पाठीच्या दुखापतीने संत्रस्त असला तरी इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग (आयपीटीएल)च्या प्रमुखाला मात्र तो या स्पध्रेत खेळणार याची खात्री आहे. या स्पध्रेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक महेश भूपतीने सांगितले की, ‘‘ आम्ही फेडररशी संवाद साधला आहे. त्याची प्रकृती उत्तम असून, तो डेव्हिस चषकसुद्धा खेळणार आहे.’’ रविवारी झालेल्या वर्ल्ड टूर फायन्सलमधून फेडररने माघार घेतली होती. परंतु या आठवडय़ाच्या अखेरीस होणाऱ्या फ्रान्सविरुद्धच्या डेव्हिस चषक अंतिम सामन्यात मात्र तो खेळणार आहे. त्यामुळे आयपीटीएलमध्ये तो खेळणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. दुखापतीतून सावरणारा राफेल नदाल हा आयपीटीएल स्पध्रेत खेळू शकणार नाही.

Story img Loader