तब्बल सतरावेळा ग्रँडस्लॅम विजेता ठरलेला ‘रॉजर फेडरर’ला फ्रांसच्या ‘जो-विलफ्राइड’ विरुद्धच्या फ्रांस खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या जो-विलफ्राइडने उपांत्यपूर्व फेरीत फेडरर वर ७-५,६-३,६-३ ने विजय मिळवला. आतापर्यंत गेल्या तीन ग्रँडस्लॅम सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा रॉजर फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला आहे. २०११ सालच्या विंबल्डन मालिकेतही जो-विलफ्राइडने रॉजर फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. माजी टेनिसपटू ‘यान्निक नोह’ यांच्यानंतर फ्रांस खुली टेनिस स्पर्धा जिंकणारा फ्रेंच खेळाडू होण्याचा मानस उपांत्य फेरी गाठलेल्या ‘जो-विलफ्राइड’चा असेल.   
दुसरीकडे महिला फ्रांस खुल्या टेनिस स्पर्धेत १५ वेळा ग्रँडस्लॅम विजेती ठरलेली सरेना विल्यम्स हिने स्वेतलाना कुझेनेत्सोवावर ६-१,३-६,६-३ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. सरेनाने २००२ साली आपली शेवटची महिला फ्रांस खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा